एथर रिझ्टा विक्रीचा १ लाखाचा टप्पा पार – फॅमिली स्कूटर मार्केटमध्ये दमदार उपस्थिती
पुणे : देशातील आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादकांपैकी एक असलेल्या एथर एनर्जीने आपल्या ‘रिझ्टा’ फॅमिली स्कूटरच्या १ लाख युनिट्स विक्रीचा मैलाचा टप्पा गाठल्याची घोषणा केली आहे. एप्रिल २०२४ मध्ये लॉन्च झाल्यानंतर, रिझ्टाने अल्पावधीतच फॅमिली स्कूटर ग्राहकांमध्ये मोठा विश्वास निर्माण केला असून, कंपनीच्या एकूण विक्रीत सध्या या मॉडेलचा वाटा सुमारे ६० टक्क्यांवर पोहोचला आहे.
एथर एनर्जीचे मुख्य व्यवसाय अधिकारी रवनीत फोकेला म्हणाले, “रिझ्टाची ही कामगिरी आमच्यासाठी मोठा टर्निंग पॉईंट आहे. भारतीय कुटुंबांच्या गरजा लक्षात घेऊन विकसित केलेली ही स्कूटर आमच्या पोर्टफोलिओला नवे परिमाण देते. आरामदायक सीट, मोठे स्टोरेज, स्मार्ट फीचर्स आणि टिकाऊ रचना या साऱ्यांचा समतोल रिझ्टामध्ये मिळतो.”
गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगड यांसारख्या राज्यांमध्ये आर्थिक वर्ष २०२५पासून रिझ्टाच्या माध्यमातून एथरचा मार्केट शेअर वाढताना दिसतो आहे.दक्षिण भारतात एथरने नंबर १ ईव्ही ब्रँड होण्याचा मान मिळवला असून त्यात रिझ्टा आणि ४५० सिरीजचा मोठा वाटा आहे.
स्किडकंट्रोल, टो अँड थेफ्ट अलर्ट, इमर्जन्सी स्टॉप सिग्नल, गूगल मॅप्स नेव्हिगेशन, आणि लाईव्ह लोकेशन शेअरिंग यांसारखी स्मार्ट सुरक्षा आणि कनेक्टेड फीचर्स रिझ्टाला इतरांपेक्षा वेगळं स्थान देतात.एप्रिल २०२४ मध्ये ‘एथर कम्युनिटी डे’ च्या निमित्ताने रिझ्टाचे अनावरण करण्यात आले होते, तर जूनपासून देशभरात विक्री सुरू झाली
