Wednesday, May 20, 2026
Latest NewsSports

‘रॉक-२७ करंडक’ १७ वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत क्रिकस्टार रायझिंग अ‍ॅकॅडमीला विजेतेपद !!


पुणे :  पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित ‘रॉक-२७ करंडक’ १७ वर्षाखालील आंतरक्लब एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत रिजुल पाटील याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर क्रिकस्टार रायझिंग अ‍ॅकॅडमीने योगेश इलेव्हन संघाचा ४ गडी राखून पराभव करत विजेतेपद संपादन केले.

लोणी येथील रॉक २७ अ‍ॅकॅडमीच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना योगेश इलेव्हनने २६.२ षटकामध्ये १३५ धावांचे लक्ष्य उभे केले. यामध्ये शिवम पिंपळे (३८ धावा), यश येलारपुरकर (३० धावा) आणि विराज भोंडवे (२४ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. रिजूल पाटील याने अचूक गोलंदाजी करताना २३ धावांमध्ये तीन गडी टिपले. व्दिथ पुजारी याने दोन गडी बाद केले. हे लक्ष्य क्रिकस्टार रायझिंग अ‍ॅकॅडमीने १६.५ षटकात व ६ गडी गमावून पूर्ण केले. विजेंद्र सिंग याने ४३ चेंडूत ७ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ७४ धावांची खेळी केली. विहान केंजळे याने ३२ धावांचे योगदान दिले आणि संघाच्या विजेतेपदाचा मार्ग सोपा केला.

अंतिम सामन्याचा संक्षिप्त निकालः
योगेश इलेव्हनः २६.२ षटकात १० गडी बाद १३५ धावा (शिवम पिंपळे ३८, यश येलारपुरकर ३०, विराज भोंडवे २४, रिजूल पाटील ३-२३, व्दिथ पुजारी २-३६) पराभूत वि. क्रिकस्टार रायझिंग अ‍ॅकॅडमीः १६.५ षटकात ६ गडी बाद १३८ धावा (विजेंद्र सिंग ७४ (४३, ७ चौकार, ६ षटकार), विहान केंजळे ३२, प्रणव विपट २-३); सामनावीरः रिजूल पाटील;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading