सॅमको म्युच्युअल फंडकडून लार्ज आणि मिड कॅप फंडची घोषणा स्थैर्य आणि आर्थिक वाढीचा समतोल साधणारा फंड
मुंबई : शेअर मार्केटमध्ये गेल्या आठ महिन्यात मोठी घसरण दिसून आली. सद्यस्थितील शेअर मार्केट स्थिरावल्याचे सकारात्मक चित्र आहे. सध्या मोमेंटम गुंतवणूकीसाठी योग्य वेळ असल्याचे संकेत मिळत असल्याने सॅमको असेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने नवीन सॅमको लार्ज आणि मिड कॅप फंडची घोषणा केली आहे. हा फंड लार्ज कॅप कंपन्यांचे स्थैर्य आणि मिड कॅप कंपन्यांची वाढ यांचा समतोल राखतो.
या फंडाची नवीन फंड ऑफर ५ जून रोजी सुरु होणार असून, १९ जून २०२५ पर्यंत गुंतवणूकीसाठी उपलब्ध राहील. सुयोग्य पद्धतीने व्यवस्थापन होत असल्याने हा फंड या प्रकारातील असा एकमेव आहे की त्यात दरांच्या हाचलाचींवर आधारित आराखडा पद्धती वापरली जाते. या पद्धतीला सी.ए.आर.ई. मोमेंट्रम योजना असे संबोधले जाते. भिन्न विभागांमधील संपूर्ण तसेच महसूल आणि उत्त्पन्नावर आधारित दरांची हालचाल या नियोजनपद्धतीत वापरली जाते. यात स्टॉक्सची निवड केवळ किंमत ध्यानात न घेता कंपनीच्या व्यवसायातील वास्तविक वाढीच्या निकषांवर केली जाते.
सेमको लार्ज आणि मिड कॅप फंडच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना भारतातील बाजार भांडवलानुसार २५० नामांकित कंपन्यांमध्ये गुंतवणूक करता येईल. सेबीच्या नियमानुसार, ग्राहक लार्ज आणि मिड कॅप या दोन्ही फंडांतील कंपन्यांमध्ये प्रत्येकी किमान ३५ टक्के गुंतवणूक करु शकतात. या गुंतवणूकीच्या माहितीती तत्परता येण्यासाठी बाजारातील चढ-उतारांची कल्पना यावी म्हणून हेजिंग आणि डेरिव्होटिव्ह या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
लार्ज आणि मिड कॅफ फंडाच्या अनावरणाप्रसंगी सेमको असेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी विराज गांधी यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “ एकदिवसीय किंवा टी-२० सारख्या क्रिकेट सामन्यांमध्ये फलंदाजाची स्थिरता आणि जलद धावा काढण्याची क्षमता या दोन्हींचे निरीक्षण केले जातो. या दोन्ही घटकांवर फलंदाजाची कामगिरी लक्षात येते. या पद्धतीला ‘बासरा’ असे संबोधले जाते. गुंतवणूकीत यशस्वी होण्यासाठी स्थिरता आणि गती यांचा समतोल राखणे महत्त्वाचे ठरते. आमचा हा नवीन फंड या दोन्ही घटकांचे समतोल राखतो. त्यामुळे गुंतवणूकदारांना दीर्घकाळ चांगला नफा मिळवण्यासाठी नियोजनपूर्वक सोप्पा मार्ग मिळतो. आमची सी.ए.आर.ई.मोमेंट्रम योजना बाजारातील परिस्थितीनुसार बदलण्यासाठी आखण्यात आली आहे. या पद्धतीचा अवलंब केल्याने तुम्हांला सातत्याने चांगला नफा मिळेल. तुमची गुंतवणूक यशस्वी ठरेल.”
हा फंड निफ्टी लार्ज मिडकॅप २५० टोटल रिफंड इंडेक्सपेक्षाही सरस ठरेल. श्रीमती निराली भन्साळी, श्री. उमेशकुमार मेहता आणि श्री. धवल जी.धनानी या तज्ज्ञांकडून या फंडाचे व्यवस्थापन सांभाळले जाईल. या तिघांनाही गती आधारित मूलभूत गुंतवणूकीचा प्रदीर्घ अनुभव आहे.
कंपनीचे मुख्य माहिती अधिकारी उमेशकुमार मेहता म्हणाले, “ सामान्यतः कंपन्यांच्या जुन्या आर्थिक आकडेवारीच्या आधारावर गंतुवणूकीच्या पद्धती आधारित असतात. आमची मोमेंटम आधारित पद्धती बाजारातील सध्याच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करते. यामुळे, सुरुवातीच्या टप्प्यातच बाजारात चांगली आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणारे शेअर्स ओळखता येतात. ही पद्धत लार्ज आणि मिड कॅप या दोन्हींच्या शेअर्समध्ये प्रभावी ठरते. या दोन्ही फंडांमध्ये नामांकित कंपन्यांच्या स्थिरता आणि नव्याने वाढणा-या कंपन्यांच्या प्रगतीची क्षमता यांचा मेळ साधला जातो. आमची ही सक्रिय गुंतवणूक पद्धत जास्त नफा मिळवण्यासाठी तयार केली आहे. त्याचबरोबर ती बाजारात घसरणीपासून संरक्षण देते आणि दीर्घकाळ संपत्ती निर्माण कऱण्यासाठी भांडवलाचा प्रभावी वापर करण्यास सक्षम ठरते.”
गुंतवणूकदार नवीन फंड ऑफरमध्ये किमान पाच हजारांपासून गुंतवणूक सुरु करु शकतात. दर महिन्याला केवळ पाचशे रुपये भरुन एसआयपीही सुरु करता येईल. यासाठी गंतुवणूकदारांनी किमान १२ आठवड्यांची गुंतवणूक करणे अपेक्षित आहे.
सेमको लार्ज कॅप फंड आणि नवीन फंड ऑफरबद्दल जाणून घेण्यासाठी कृपया
आमच्या https://www.samcomf.com/mutual-funds/samco-large-and-mid-cap-fund-direct-growth/lmdgg या संकेतस्थळाला भेट द्या.
