Wednesday, May 20, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

शेतकऱ्याच्या दुचाकीवर बेडडोम मांजऱ्या या प्रजातीचा अत्यंत दुर्मिळ असा साप आढळला

पुणे: प्रतिनिधी

भोर तालुक्यातील बनेश्वर येथे करण जाधव या शेतकऱ्याच्या दुचाकीवर बेडडोम मांजऱ्या या प्रजातीचा अत्यंत दुर्मिळ असा साप आढळून आला आहे. सह्याद्रीच्या घनदाट जंगलामध्येही क्वचितच आढळणारा हा साप नागरी वस्तीत आढळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेषतः भोर तालुक्यात या प्रजातीचा साप सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

रविवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जाधव यांनी वन्य प्राणी आणि सर्प रक्षक असोसिएशनचे कार्याध्यक्ष विशाल शिंदे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून सापाबद्दल माहिती दिली. त्यांनी विलास धोंगडे, संतोष पाटील, श्रीकांत खेडकर या सर्पमित्रांना जाधव यांच्या घरी रवाना केले. त्यांना अत्यंत दुर्मिळ असा हा साप आढळून आला.. 

अंगाचे वेटोळे करून बसणारा हा सर्प अचानक झेप घेऊन दंश करतो. सौम्य विषारी असलेला हा साप साधारणपणे रात्रीच सक्रिय असतो. सुमारे एक मीटर लांबीचा हा साप माणसापासून कायम अंतर राखून असतो. या प्रजातीचा साप लाजाळू आणि एकांतप्रिय असतो. त्याचे डोळे मांजरासरखे मोठे असल्यामुळे त्याला ‘कॅट स्नेक’ असे संबोधले जाते. त्याच्या अंगावर फिकट पट्टे असतात. जंगल क्षेत्रात वाढणाऱ्या अतिक्रमणामुळे आणि वाढत्या तापमानामुळे जंगलातील प्राणी नागरी वस्तीत येत असल्याचा दावा सर्पमित्रांनी केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading