Saturday, May 30, 2026
Latest NewsLIFESTYLEPUNE

इंडिअन आर्ट प्रमोटर तर्फे ‘कलास्पंदन आर्ट फेअर’ चे पुण्यामध्ये आयोजन

 

पुणे : इंडियन आर्ट प्रमोटर्स यांच्या संकल्पनेमधून आयोजित करण्यात येणारे ‘कला स्पंदन आर्ट फेअर’ शुक्रवार दि. २ मे ते रविवार दि. ४ मे २०२५ दरम्यान एरंडवणे येथील डी पी रस्त्यावरील सिद्धी बँक्वेट्स या ठिकाणी संपन्न होणार आहे. हे आर्ट फेअर २ मे ते ४ मे दरम्यान दुपारी १२:०० ते रात्री ९:०० वाजेपर्यंत खुले असून हे सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे, असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.

कलास्पंदन आर्ट फेअर हे एक भारतामधील आघाडीचे आर्ट फेअर असून किफायतशीर दरात कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे याबरोबरच कला रसिकांना थेट कलाकारांशी संवाद साधत, त्यांची कला समजून घेता यावी, कलाकृती खरेदी करता यावी या उद्देशाने आम्ही हे उपक्रम सुरु केल्याचे सुदीप चक्रबर्ती यांनी सांगितले. प्रतिथयश व नवोदित कलाकार यामध्ये दुवा साधणे हे या आर्ट फेअरचे एक प्रमुख उद्दिष्ट्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

या आर्ट फेयर चे उद्घाटन शुक्रवार दिनांक २ मे रोजी दुपारी २ वाजता होणार असून मराठी सिनेअभिनेते अशोक कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. तसेच ज्येष्ठ ३डी कलाकार – रामजी शर्मा आणि रेलीकॉन शेल्टर्स प्रा. ली. चे व्यवस्थापकीय संचालक, धनंजय निंबाळकर हे मान्यवर उपस्थित असणार आहेत.

पुण्यामध्ये आयोजित होणाऱ्या कलास्पंदन आर्ट फेअर मध्ये अॅबस्ट्रक्ट पेंटिंग्ज, अल्कोहोल इंक आर्ट, ऑईल, वॉटर, अॅक्रेलिक कलर पेंटिंग्ज, मिक्स मिडीयम पेंटिंग्ज, रेझीन आर्ट, सिरॅमिक आर्ट, डेकोरेटिव्ह आर्ट्स यांबरोबरच पारंपारिक कला, कलाकृतींपासून ते डिझायनर संकल्पनांपर्यंत सर्व प्रकारच्या हजारो कलाकृती पुणेकर रसिकांना पहाता येणार आहेत ज्या देशाच्या विविध भागातून आलेल्या उभरत्या कलाकारांच्या असणार आहेत. २०२५ पासून ‘कलास्पंदन आर्ट फेअर’ चे आयोजन मुंबई येथे केले जात आहे तसेच नोव्हेंबर २०२५ मध्ये हैदराबाद येथेही आयोजन केले जाणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading