Saturday, May 30, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Parbhani: पहलगाम हत्याकांडाच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे मोर्चा

परभणी : जम्मू काश्मिरमधील पहलगाम येथील पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे परभणीत गुरुवारी (दि.24) सायंकाळी जोरदार निषेध मोर्चा काढण्यात आला. शनिवार बाजारातून सायंकाळ सव्वा सहा वाजेच्या सुमारास या मोर्चास प्रारंभ झाला. तत्पूर्वी वेदशास्त्रसंपन्न बाळुगुरु असोलेकर, हभप अच्युत महाराज दस्तापुरकर यांनी हजारोंच्या जनसमुदायास संबोधित करतेवेळी त्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. हिंदू समाजावर सातत्याने या छुप्या पध्दतीने होणारे हे हल्ले संयमाची सीमा ओलांडणारे आहेत, असे स्पष्ट केले. केंद्र सरकारने या हत्याकांडाच्या पार्श्‍वभूमीवर आता कठोर भूमिका घेतल्या पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

विश्‍व हिंदु परिषदेचे क्षेत्रीय मंत्री अनंत पांडे यांनीही आपल्या भाषणातून हिंदू समाजावरील अन्याय, अत्याचार आता सहन केले जाणार नाहीत, त्या विरोधात संघटीतपणे उभे राहू, अशी ग्वाही दिली. मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनानंतर या मोर्चाने नानलपेठ कॉर्नर, छत्रपती शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, अष्टभूजा चौक, आर.आर. टॉवर मार्गे स्टेशन रोडवरुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्थान केले. मोर्चात हजारोंचा जनसमुदाय सहभागी होता. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरीकांनी यावेळी ‘जय श्रीराम’ ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’चे नारे देवून बाजारपेठ दणाणून सोडली. मोर्चातील हजारो युवकांनी ‘पाकीस्तान मुर्दाबाद’ची घोषणाबाजी करीत तीव्र रोष व्यक्त केला.

खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, डॉ. विवेक नावंदर, शिवसेनेचे नेते आनंद भरोसे, जिल्हाध्यक्ष व्यंकट शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, माजी नगरसेवक शेख शब्बीर, भारतीय जनता पार्टीचे नेते डॉ. केदार खटींग, भारतीय जनता पार्टीचे बाळासाहेब जाधव, सुनील देशमुख, मधुकर गव्हाणे, रितेश जैन, मंगल मुदगलकर, संजय रिझवानी, संजय कुलकर्णी, अनुप शिरडकर, मधुसुदन वाकोडकर, अभिषेक वाकोडकर, दिनेश नरवाडकर, डॉ. मंजूषा नरवाडकर, राजेश देशपांडे, माजी नगराध्यक्ष कमलकिशोर अग्रवाल, भिमराव वायवळ, सुरेश भुमरे, शंकर भागवत, संजय गाडगे, भालचंद्र गोरे, विशाल बुधवंत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागीय संघचालक डॉ. रामेश्‍वर नाईक, शहर संघचालक माऊली शिंदे, जिल्हा कार्यवाह अभिजित आष्टूरकर, अजय हमदापुरकर, विश्‍व हिंदु परिषदेचे राजकुमार भांबरे, सुनील रामपुरकर, अभिजित कुलकर्णी, डॉ. राजगोपाल कालानी, राष्ट्र सेविका समितीच्या  सुनीता तालखेडकर,  सुरेखा दराडे,  मृदुल धारासूरकर, प्रिती वैद्य, शुभांगी चौधरी, गौरी धारासूरकर, तनूजा कापरे, डॉ.जयश्री कालानी, वैशाली पोटेकर, अनिता जोशी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शंकर देशमुख, जिल्हा ग्राहक मंचाचे माजी अध्यक्ष दिपक देशमुख, सुशील देशमुख,

व्यापारी महासंघाचे सचिव सचिन अंबिलवादे, सचिन सरदेशपांडे, शंकर आजेगांवकर यांच्यासह अन्य मान्यवर व हजारो नागरीक या मोर्चात सहभागी होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading