Saturday, June 13, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

भारताचा BSF जवान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत;पाकिस्तानी रेंजर्स ने घेतले ताब्यात!

 

नवी दिल्ली  : पंजाबमधील फिरोजपूर जवळील आंतरराष्ट्रीय सीमेवर ही घटना घडली आहे. संबंधित जवान ड्युटी करत असताना चुकून सीमा ओलांडली. त्यानंतर पाकिस्तान सैन्याने लगेच त्यांना ताब्यात घेतले.

बीएसएफचे कॉन्स्टेबल पी. के. सिंग यांना पाकिस्तानी सैन्यात पकडले आहे. सिंग हे बीएसएफच्या 182 बटालियनमध्ये सेवेत आहेत. झिरो लाईनवरील गेट क्रमांक 208/1 जवळ ते नियमित ड्युटी करत होते. जवळच्या शेतकरी शेतात काम करत होते. तिथूनच जात असताना उन्ह खूप असल्याने ते एका झाडाखाली थांबले. मात्र, हे करत असताना त्यांच्याकडून चुकून सीमा ओलांडण्यात आली होती. त्याचवेळी पाकिस्ताने सैन्याने सिंग यांना ताब्यात घेतले.

त्यांना सोडवण्यासाठी बीएसएफ अधिकाऱ्यांकडून फ्लॅग बैठका सुरू आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading