Monday, September 14, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘आई तुळजाभवानी’ मालिकेत देवी आख्यायिकांचा ‘नवा अध्याय’

कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी या मालिकेत देवीच्या आख्यायिकांचे नवा अध्याय सुरू झाला असून या अध्यायातली बारकू गुरख्याची पहिली गोष्ट सध्या उलगडते आहे. देवीने तुळजापूर परिसरात असंख्य भक्तांचा जो उद्धार केला त्याच्या ज्या आख्यायिका आहेत त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे देवीने भक्तांना परिस्थितीशी लढायचे, झुंजायचे बळ दिले, संकटावर मात करण्याची दिशा दिली. याच प्रेरणादायी रंजक आख्यायिका मालिकेत उलगडत आहेत. पुढे मालिकेत काय काय घडणार जाऊन घेण्यासाठी बघा आई तुळजाभवानी सोम ते शनि रात्री ९ वा. आपल्या कलर्स मराठीवर.

भोळसट बारकू गुरख्याच्या उद्धाराच्या गोष्टी सोबत महिषासुराचे संकटही आता गडद होत आहे. महिषासुराचा आणि शुंभाचा विवाह संपन्न झाला असला तरी तुळजाचा त्याचा शोध अजून सुरू आहे, त्याच्या या शोधात अडथळा बनून उभी ठाकली आहे ती त्याचीच पत्नी शुंभा, तिने महिषासुराचेच हेर मारून परिस्थिति बिकट केली आहे. शुंभाच्या मदतीला देवीच्या पावित्र्याच्या ,मांगल्याच्या विरोधात असलेली अलक्ष्मी आली असून तिची काळी कारस्थान थेट देवीच्या भक्तांवर आघात करणारी आहेत. अलक्ष्मीचा भूतलावर सुरू झालेला हाहाकार हा आई तुळजाभवानी समोर महिषासुराच्या वाढत्या उपद्रवासोबतच मोठे आव्हान ठरत आहे. या परिस्थितीतही देवी आपल्या भक्तांना प्रेरणा देते त्याची ही विलक्षण रंजक गोष्ट आवर्जून अनुभवण्यासारखी आहे,

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading