Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

अकरावी प्रवेशासाठी रविवारी मार्गदर्शन

पुणे  : अकरावीच्या प्रवेशाची विद्यार्थ्यांना तसेच पालकांना चिंता लागलेली असते. त्यासंदर्भात सर्व माहिती व काही शंकांचे निरसन करण्यासाठी फर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालयाने येत्या रविवारी सकाळी 10 वाजता महाविद्यालयाच्या अँफीथिएटरमध्ये विनामूल्य कार्यशाळा आयोजित केली आहे.

यासाठी जे शिक्षक प्रत्यक्ष या प्रवेश समितीत कार्य करतात तेच शिक्षक प्रवेशाबाबत माहिती देतील. प्रवेशाबरोबरच १० / १२ वी नंतरचे करिअर गायडन्स याचीही सखोल माहिती दिली जाईल. त्याच बरोबर विद्यार्थी व पालकांच्या माहितीसाठी फर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालयात विविध विभागात कशा प्रकारे शिक्षण दिले जाते, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत ऑलिम्पियाड सारख्या विविध परीक्षा घेतल्या जातात याचीही माहिती दिली जाईल. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नीट, जेईई व एमएचटी – सीईटी या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी कशी करावी व त्याची तत्सम माहिती महाविद्यालयातीलच शिक्षक देणार आहेत, यामुळे भविष्यातील शिक्षणाबाबत तसेच करिअर आणि अकरावी प्रवेशाबाबत आपला मार्ग मोकळा होईल यात शंका नाही. विद्यार्थी व पालकांच्या प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी आणि शंकांचे निरसन होण्यासाठी हे सेमिनार महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading