लघुउद्योग भारतीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी पुण्याचे अमित घैसास
पुणे : लहू उद्योग क्षेत्राच्या उन्नतीसाठी देशभर सक्रीय असणाऱ्या, देशातील ५८० हून अधिक जिल्ह्यांमध्ये ५० हजारांहून अधिक लघु उद्योजक सभासद असलेल्या लघुउद्योग भारतीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी पुण्याचे अमित घैसास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, ठाणे येथे नुकतेच संपन्न झालेल्या राष्ट्रीय कार्यकारणी व कार्यसमितीच्या बैठकीत व उद्यमी संमेलनात डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत लघुउद्योग भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष घनश्याम ओझा यांनी ही नियुक्ती जाहीर केली.
अमित घैसास हे पुण्यातील प्रसिद्ध यशप्रभा उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक असून त्यांनी याआधी लघुउद्योग भारतीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम पहिले आहे. जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर देखील घैसास कार्यरत आहेत.
यावेळी लघुउद्योग भारतीच्या महाराष्ट्र प्रदेश विभागाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची नावे देखील जाहीर करण्यात आली. या सर्वांचा कार्यकाळ एप्रिल २०२५ ते मार्च २०२७ असा २ वर्षांचा असेल. नवीन पदाधिकाऱ्यांची यादी पुढील प्रमाणे.
अमित घैसास – प्रदेशाध्यक्ष, आशीष चंदाराणा – प्रदेश उपाध्यक्ष, मारुती कुलकर्णी – प्रदेश उपाध्यक्ष, अशोक काळे – प्रदेश उपाध्यक्ष, हरीश हांडे – प्रदेश महा मंत्री, गौरव जोशी – प्रदेश सहमंत्री, मदार लेले – प्रदेश सहमंत्री, प्रवीण काळे – प्रदेश सहमंत्री, सीए नवीन देढीया – प्रदेश कोषाध्यक्ष.
