Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मध्यवर्ती समितीकडून सर्वपक्षीय संयुक्त अभिवादन समारंभ

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 134 व्या जयंती निमित्त पुणे ससून हॉस्पिटल समोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता सर्वपक्षीय व सर्व समावेश संयुक्त अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.

यंदाच्या वर्षी प्रथमच भीमजयंती मध्यवर्ती समितीच्या वतीने आयोजित संयुक्त अभिवादन कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार , केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ , राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील , मनपा आयुक्त , पोलीस आयुक्त , जिल्हाधिकारी यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी यांच्यासह पुणे शहरांमधील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच सर्व पक्षांचे शहराध्यक्ष व मान्यवर यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

यावेळी आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष संघटनांचे नेते व आजी-माजी लोकप्रतिनिधी हे देखील अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच एका स्टेजवर उपस्थित राहून अभिवादनासाठी येणाऱ्या सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करणार आहेत.

सदर कार्यक्रमाचे आयोजन मध्यवर्ती समितीचे राहुल डंबाळे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे , रिपाई नेते परशुराम वाडेकर व रिपब्लिकन युवा मोर्चाच्या सुवर्णा डंबाळे यांचेकडून करण्यात आले आहे. याप्रसंगी जयदेव गायकवाड , एल. टी. सावंत , अविनाश साळवे , वसंत साळवे , शैलेंद्र मोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading