Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

जोशी रेल्वे म्युझिअमचा २७ वा वर्धापन दिन साजरा; पुणे मेट्रोच्या प्रतिकृतीची निर्मिती

 

ट्रेन मॉडेलींगचा छंद जोपासू पाहणाऱ्यांसाठी म्युझिअमच्या वेबसाईटवरील विशेष विभागाचे उद्घाटन

पुणे : पुण्यातील सुप्रसिद्ध रेल्वे प्रतिकृतींचे संग्रहालय जोशीज म्युझिअम ऑफ मिनीएचर रेल्वेजने मंगळवारी आपला २७ वा वर्धापन दिन साजरा केला. भिलवडी येथील प्रसिद्ध चितळे डेअरीचे संचालक गिरीश चितळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जोशी म्युझिअमचे देवव्रत व रवी जोशी यांच्या उपस्थितीत यावेळी चितळे यांच्या हस्ते ट्रेन मॉडेलींगचा छंद जोपासू पाहणाऱ्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या म्युझीयमच्या वेबसाईट वरील एका विशेष विभागाचे उद्घाटन करण्यात आले. या विभागाद्वारे ट्रेन मॉडेलींगसंबंधी उपकरणे उपलब्ध करून देण्यात येतील. पुणे मेट्रोच्या प्रतिकृतीची निर्मिती जोशी म्युझिअमतर्फे करण्यात येत आहे त्याची पाहणी देखील चितळे यांनी यावेळी केली.

याप्रसंगी बोलतांना गिरीश चितळे म्हणाले की २ दशकांपूर्वी मी रेल्वे प्रतिकृतींचे हे संग्रहालय पाहायला आलो होतो. आजही या संग्रहालयातील शो बघतांना मला तितकाच आनंद झाला. कला आणि विज्ञान यांचा अनोखा मिलाफ असलेले हे संग्रहालय आपल्या जीवनाचा महत्वाचा घटक असलेल्या रेल्वेच्या विविध प्रकारांची माहिती अतिशय रंजकपणे उपलब्ध करून देते. आज भारतातील मेट्रोचे जाळे वाढत आहे. तसेच भारतीय रेल्वेचे आधुनिकीकरण आंतरराष्ट्रीय दर्जाचे होते आहे त्यामुळे आजच्या तरुण पिढीला येथील चालते फिरते रेल्वेचे प्रकार समजण्यास आणखी सोपे झाले आहे, असे चितळे यावेळी म्हणाले.

गेल्या वर्षी आम्ही वंदे भारत या रेल्वेच्या प्रतिकृतींचे ६०० नग तयार करून दिले होते. यंदा आम्ही पुणे मेट्रोची प्रतिकृती तयार करत आहोत. लवकरच आपल्या पुणे मेट्रोच्या या प्रतिकृती पुणे मेट्रोच्या काही स्थानकांवर उपलब्ध होतील अशी माहिती जोशी रेल्वे संग्रहालयाचे संचालक रवी जोशी यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading