Saturday, May 30, 2026
Latest NewsSports

‘एसए अजिंक्यपद करंडक’ १४ वर्षाखालील आंतरक्लब टी-२० क्रिकेट २०२५ स्पर्धेचे आयोजन !!

पुणे :  एसए स्पोटर्स मॅनेजमेंट तर्फे ‘एसए अजिंक्यपद करंडक’ १४ वर्षाखालील आंतरक्लब टी-२० क्रिकेट २०२५ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २५ मार्च ते २० एप्रिल २०२५ या कालावधीत होणार असून स्पर्धेत पुण्यातील आणि जिल्ह्यातील एकूण २० संघांनी भाग घेतला आहे.या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना एसए स्पोटर्स मॅनेजमेंटचे शराफत अली यांनी सांगितले की, या स्पर्धेत पुण्यातील विविध क्लब आणि अ‍ॅकॅडमीचे एकूण २० संघ सहभागी होणार आहेत. १४ वर्षाखालील मुलांना स्पर्धात्मक आणि प्रोफेशनल धर्तीवर खेळण्याचा अनुभव मिळावा आणि त्यांच्यातील गुणवत्तेला संधी मिळावी, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. लाल चेंडूवर होणार्‍या या स्पर्धेत साखळी आणि बाद फेरी मिळून एकूण ५० सामने होणार आहेत. स्पर्धेत एकूण १ लाख रूपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.

विजय क्रिकेट अ‍ॅकॅडमी, अष्टपैलु स्पोटर्स, धीरज जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी, क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी, क्रिक९ अ‍ॅकॅडमी, व्हिडीआर, एके स्पोटर्स, योगेश इलेव्हन, प्रशांत क्रिकेट झोन, मॅव्हरीक्स् अ‍ॅकॅडमी, अजित वाडेकर अ‍ॅकॅडमी, प्रसाद ठाकूर अ‍ॅकॅडमी, छत्रपती अ‍ॅकॅडमी, महाराष्ट्रीय मंडळ अ‍ॅकॅडमी, पुणे क्रिकेट क्लब, सिल्व्हर क्रिकेट अ‍ॅकॅडमी, लिजंड्स स्पोटर्स क्लब, एसएआरके अ‍ॅकॅडमी, कोद्रे फार्म्स अ‍ॅकॅडमी या संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे.

विजेत्या संघाला करंडक आणि ४५ हजार रूपये तर, उपविजेत्या संघाला करंडक आणि ३० हजार रूपये मिळणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक तसेच उदयोन्मुख खेळाडू यांना दिड हजार रूपये आणि करंडक याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू याला दोन हजार रूपये आणि करंडक तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर आणि फायटर ऑफ मॅच अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading