पायथनच्या साहाय्याने व्यवसाय प्रक्रिया स्वयंचलित करणे या कार्यशाळेचे आयोजन
पुणे : PIMSE (Poona Institute of Management Sciences and Entrepreneurship) १५ ते २५ फेब्रुवारी २०२५ दरम्यान *”पायथनच्या साहाय्याने व्यवसाय प्रक्रिया स्वयंचलित करणे”* या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. डॉ. शबीब अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी विद्यार्थ्यांनी डेटा एंट्री, अहवाल निर्मिती आणि ईमेल सूचना यांसारख्या महत्त्वाच्या व्यवसाय प्रक्रिया *पायथनद्वारे स्वयंचलित* करण्याचे तंत्र आत्मसात केले. डॉ. पोरीनिता बॅनर्जी (संचालक-प्रभारी) यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉ. झरीना शेख यांच्या समन्वयाने झालेल्या या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सैद्धांतिक व व्यावहारिक शिक्षणाच्या समतोलामुळे सहभागींसाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरली.
