Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्युअरशिप येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा 

पुणे : पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्युअरशिप येथे दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने काव्यवाचन व भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये एकूण १४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
स्पर्धेच्या परीक्षक म्हणून डॉ. वसीम राजा सय्यद व प्रो. अकबर खान उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मराठी भाषा, संस्कृती, निसर्ग, समाजातील बदल यासारख्या विषयांवर सुंदर कविता सादर केल्या. स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. मोईज शेख, द्वितीय क्रमांक कु. साजिया अन्सारी, तृतीय क्रमांक कु. विशाल जगताप, तर सर्वोत्तम स्पर्धक म्हणून कु. विशाखा कांबळे यांची निवड करण्यात आली. विजेत्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे मार्गदर्शन डॉ. पोरीनिता बॅनर्जी मॅडम यांनी केले, तर आयोजन डॉ. पायल समंदरिया व मुबारक तांबोली यांनी केले. सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा दिवस यशस्वी ठरला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading