Tuesday, June 16, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

अमेरिकेने रशियाच्या बाजूने मतदान केले

वॉशिंग्टन: वृत्तसस्था

रशिया युक्रेन युद्धाला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर युक्रेनने रशियाची निंदा करणारा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघात मांडला. अमेरिकेत सत्ता परिवर्तन झाल्यानंतर अमेरिकेने आपल्या जुन्या भूमिकेवरून उलटफेर घेऊन या प्रस्तावाच्या विरोधात, अर्थात रशियाच्या बाजूने मतदान केले आहे. भारत आणि तटस्थ भूमिका घेऊन या प्रस्तावावर मतदान न करण्याचा निर्णय घेतला. 

ज्यो बायडेन राष्ट्राध्यक्ष असताना अमेरिकेने युक्रेनला रशियाच्या विरोधात सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती. अमेरिकेकडून युक्रेनला शस्त्रास्त्र आणि निधीचा मोठ्या प्रमाणात पुरवठा केला जात होता. मात्र, अमेरिकेत सत्तांतर होऊन डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेने आपली भूमिका बदलली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध समाप्त व्हावे यासाठी ट्रम्प प्रशासन प्रयत्नशील आहे. 

रशियाला आक्रमक म्हणून त्याची निंदा करण्याची आणि युक्रेनमधून रशियन सैन्य माघारी घेण्याची मागणी करणाऱ्या या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य असणाऱ्या 65 देशांनी मतदान न करण्याची भूमिका घेतली. अमेरिका, इस्राएल आणि हंगेरी या देशांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. हा प्रस्ताव 93 मतांनी मान्य करण्यात आला. विशेष म्हणजे सुरक्षा परिषदेत सदस्य असणाऱ्या पाचही देशांनी या प्रस्तावावर मतदान केले नाही. 

रशिया आणि युक्रेन या देशातील दीर्घकाळ सुरू असलेल्या युद्धाचे दुष्परिणाम केवळ या दोन देशांनाच नव्हे तर संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत. त्यामुळे हे युद्ध लवकरात लवकर संपुष्टात यावे, अशी अमेरिकेची भूमिका आहे. सध्या ट्रम्प हे सातत्याने युक्रेनचे पंतप्रधान गोर्बाचेव्ह झेलेन्स्की यांच्यावर टीकेची झोड उठवीत आहेत. इतर देशांसाठी अमेरिकेने निधी आणि संसाधनांचा वापर करण्यापेक्षा अमेरिकेच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे, अशी ट्रम्प यांची भूमिका आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading