जयहिंदच्या आठव्या शाखेचे हडपसर येथे उद्घाटन
पुणे: पुण्यातील प्रसिद्ध जयहिंद स्टोअरची आठवी शाखा आज सिटी सेंटर, हडपसर येथे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना संचालक मेहुल जैन म्हणाले, “ही जयहिंदची आठवी आणि मेवाड आउटलेट्ससह दहावी शाखा आहे. आमचा हा कौटुंबिक व्यवसाय तिसऱ्या पिढीत प्रवेशला आहे. लंडनमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी व्यवसायात सहभागी झालो आणि त्याच्या विस्तारावर लक्ष केंद्रित केले. वाढीच्या दृष्टीने आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी नवीन शाखा उघडत आहोत. पुण्याचा झपाट्याने होणारा विस्तार लक्षात घेता, शहराच्या प्रमुख प्रवेशद्वारांवर आमची उपस्थिती निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. या धोरणाच्या भाग म्हणून आम्ही आता हडपसरमध्ये नवीन स्टोअर सुरू केले आहे. उद्घाटनाच्या निमित्ताने ग्राहकांसाठी आम्ही सध्या फ्लॅट २०% सवलत तसेच विविध ब्रँड्सवर खास ऑफर्स देत आहोत.”
