Monday, June 15, 2026
BusinessLatest News

वीवर्क इंडिया मॅनेजमेंट लिमिटेड तर्फे सेबीकडे डीआरएचपी सादर

 

डीआरएचपी लिंक: https://wework.co.in/investors-relations/Draft+Red+Herring+Prospectus.pdf

भारतातील आघाडीच्या प्रीमियम फ्लेक्सिबल वर्कस्पेस ऑपरेटरपैकी एक आणि मागील तीन आर्थिक वर्षांतील (स्रोत: CBRE) एकूण महसुलाच्या आधारावरील सर्वात मोठे ऑपरेटर वीवर्क इंडिया मॅनेजमेंट लिमिटेड (“WeWork India”) ने भारतीय सिक्युरिटीज आणि एक्स्चेंज बोर्ड (सेबीकडे आपला ड्राफ्ट रेड हिअरिंग प्रॉस्पेक्टस (“डीआरएचपी”) सादर केला आहे.

कंपनी मोठ्या उद्योगसंस्थालघु आणि मध्यम उद्योगस्टार्टअप्स आणि वैयक्तिक व्यावसायिकांसाठी उच्च-गुणवत्तेची फ्लेक्सिबल कार्यक्षेत्रे उपलब्ध करून देते. त्यांच्या सदस्यांमध्ये Fortune 500 कंपन्याआंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत कॉर्पोरेशन्समोठ्या उद्योगसंस्थाजीसीसीजएमएसएमईज आणि स्टार्टअप्स यांचा समावेश आहे.

कंपनीच्या प्रारंभिक समभाग विक्रीच्या ऑफर मध्ये 43,753,952 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) समाविष्ट आहे.

या ऑफर फॉर सेल मध्ये एम्बसी बिल्डकॉन एलएलपी (“प्रवर्तक विक्री समभागधारक”) यांच्याकडून 33,458,659 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि एरियल वे टेनंट लिमिटेड (“गुंतवणूकदार विक्री समभागधारक”) यांच्या कडून 10,295,293 पर्यंतचे इक्विटी शेअर्स समाविष्ट आहेत.

कंपनीला या ऑफर फॉर सेल मधून कोणतेही आर्थिक उत्पन्न मिळणार नाही.

या इश्यूसाठी जेएम फायनान्शियल लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेडजेफ्रीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड आणि 360 ONE WAM लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLMs) म्हणून नियुक्त आहेत.

वीवर्क इंडियाने जागतिक वीवर्क नेटवर्कशी असलेल्या सहकार्याच्या माध्यमातून आपला ब्रँड आणि योजना मजबूत केल्या आहेत. त्यायोगे अनेक प्रतिष्ठित जागतिक ब्रँड्ससोबत दीर्घकालीन व्यवसायिक संबंध प्रस्थापित केले आहेत. त्यात अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसजेपी मॉर्गन, वॉर्नर ब्रॉस. डिस्कव्हरी, Deutsche Telekom आणि Grant Thornton यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

कंपनी ही भारतातील वीवर्क ब्रँडची एकमेव परवाना धारक (Exclusive Licensee) आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading