रांजेकर रिअल्टीच्या दिवाळी गृह महोत्सवाला सुरुवात
पुणे : बांधकाम क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या रांजेकर रिअल्टीने आपल्या दिवाळी गृहमहोत्सवाची घोषणा केली आहे. याविषयी माहिती देताना संस्थेचे संचालक अनिरुद्ध रांजेकर म्हणाले की येत्या २७ ऑक्टोबर पर्यंत रांजेकर रिअल्टी तर्फे सादर करण्यात आलेल्या ७ गृहप्रकल्पांमधून आपल्या स्वप्नातील घर खरेदी केल्यास घर खरेदीदारांना विविध योजनांचा लाभ मिळणर आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रुपये २० लाखांपर्यंतचे लाभ मिळवण्याची संधी असेल. या दिवाळी गृह महोत्सवांतर्गत घराच्या किमतीवर भरघोस सवलत, किचन ट्रॉली, फॉल्स सीलिंग, एसी व शॉवर ऐन्क्लोजर या सारख्या सुविधा व रुपये १ लाखांपर्यंतच्या गृहपयोगी वस्तूंचे गिफ्ट व्हाउचर आदींचा समावेश आहे.
सदर दिवाळी गृह महोत्सवात सादर होणाऱ्या गृहप्रकल्पांमध्ये वसुंधरा (उजवी भुसारी कॉलनी) उमाशंकर प्रसाद (पौड रस्ता), धनसंपदा (एरंडवणे), जगदीप (विधी महाविद्यालय रस्ता), तीर्थ (रामबाग कॉलनी), अवंतिका (आयडीयल कॉलनी) व स्नेहभवन (प्रभात रस्ता) या प्रकल्पांचा समावेश आहे. हे सर्व गृहप्रकल्प रेरा नोंदणीकृत असून यामध्ये २, २.५, ३ व ४ बीएचके अशा प्रकारच्या सदनिकांचे पर्याय उपलब्ध असतील. सध्याच्या जीवनशैलीला अनुरूप सुविधा या रांजेकर रिअल्टीच्या गृह प्रकल्पाची वैशिष्ट्ये असतात. यामध्ये प्रामुख्याने वर्क फ्रॉम होम साठीच्या विशेष जागा, जिम, मुलांसाठी खेळण्याची जागा, स्ट्रेचर लिफ्ट व वाचनालय यासारख्या सुविधा आहेत.
या गृह महोत्सवाचे विशेष प्रदर्शन रांजेकर रिअल्टीच्या उजवी भुसारी कॉलनी न्यू इंडिया शाळेजवळ साकारत असलेल्या वसुंधरा या भव्य गृहप्रकल्पाच्या जागेवर भरवण्यात आले आहे. येथे ग्राहकांना सँपल फ्लॅट देखील बघत येईल. तसेच मराठी रंगमंच व दूरचित्रवाणीवर कार्यरत असलेले लोकप्रिय अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांना रांजेकर रिअल्टीने सदिच्छादूत / ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून करारबद्ध केले आहे.
