आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त भोंडल्याचा कार्यक्रम उत्साहात साजरा
‘मेरी रातें, मेरी सडके’ उपक्रमाची चौथी रात्र संपन्न
अरडी गं बाई परडी, हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली, अक्कण माती चिक्कण माती हे शब्द कानावर पडले कि भोंडल्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. जगण्याचं सार सांगणाऱ्या या गीतांतून महाराष्ट्राच्या संस्कृती प्रतिबिंबित होत असते. प्रचलित असलेला मुलींचा सामुदायिक खेळाचा प्रकार कोथरूड येथील तुळजाभवानी मंदिराजवळ पार पडला. निमित्त होते नवरात्री व संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केलेल्या आंतरराष्ट्रीय बालिका दिनाला यावर्षी 12 वर्षे पूर्ण होत असल्याचे. ह्या कार्यक्रमाचे आयोजन महिला जागर समितीतर्फे करण्यात आले.
लहान मुलींनी निर्भय होत मुक्तपणे नाचावं, खेळावं, गावं यासाठी कार्यक्रमाची चौथी रात्र हि संत मुक्ताबाई यांना समर्पित करून साजरी केली गेली. मुक्ताई तुझ्या प्रेमाने, मुक्ता तुझ्या बुद्धीने भय इथले संपवायचे आहे हा संदेश देत उपस्थितांना भोंडला कार्यक्रमात सहभागी करून घेतले असे कार्यक्रमाचे समन्वयक स्नेहल बी एस यांनी सांगितले.
यावेळी सगुणा महिला संघटनेचे शोभा करांडे, भारत जोडो अभियानचे संगीता पाटणे, रंजना पासलकर, मिळून साऱ्याजणीच्या स्मिता शेट्टी उपस्थित होते.
