पीएमपीएमएलच्या पर्यटन बससेवेमध्ये कोरेगांव भिमा विजयस्तंभाचा समावेश
पुणे : प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी व रविवारी विविध कार्यालये, कॉलेज, शाळा, औद्योगिक क्षेत्रातील व आयटी क्षेत्रातील कंपन्यांमधील नोकरदारांना साप्ताहिक सुट्टी असल्याने पीएमपीएमएलच्या पर्यटन बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद जास्त असतो. पीएमपीएमएल कडून पर्यटन बससेवेच्या माध्यमातून प्रवाशांचा प्रवास आरामदायी, व माफक दरात होणेच्या दृष्टीने धार्मिक व पर्यटन स्थळांकरिता वातानुकूलीत ई-बसेसव्दारे विशेष पर्यटन बससेवा प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार, सार्वजनिक सुट्टी व इतर दिवशी प्रवाशांच्या मागणीनुसार दिली जाते. सध्या पीएमपीएमएल च्या एकूण ८ पर्यटन बससेवा सुरू असून यापैकी पर्यटन बससेवा क्र. ६ मध्ये येत्या दसाऱ्या (दि. १२) पासून नव्याने कोरेगांव भिमा विजय रणस्तंभ या ऐतिहासिक स्थळाचा समावेश करण्यात आला आहे.
असा असेल मार्ग – पुणे स्टेशन-वाघेश्वर मंदिर (वाघोली)-वाडेबोल्हाई मंदिर-तुळापूर त्रिवेणी संगम-छत्रपती संभाजी महाराज समाधी (वढू बुद्रुक)-रांजणगांव गणपती मंदिर-कोरेगांव भिमा विजय रणस्तंभ-पुणे स्टेशन.
बस सुटण्याची वेळ – ०९:००
बस पोहोचण्याची वेळ – १९:००
बसचा पहिला व शेवटचा थांबा – पुणे स्टेशन बसस्थानक
प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-
पीएमपीएमएल पर्यटन बससेवेबाबत इतर माहिती खालीलप्रमाणे –
- बसेसच्या आसन क्षमतेनुसार पूर्ण ३३ प्रवाशांचे ग्रुप तिकीट काढल्यास ५ प्रवाशांच्या तिकीट दरामध्ये १०० टक्के सवलत
- परिवहन महामंडळाचे १) डेक्कन जिमखाना, २) पुणे स्टेशन, ३) स्वारगेट, ४) कात्रज, ५) हडपसर गाडीतळ, ६) भोसरी बसस्थानक, ७) निगडी, ८) मनपा भवन या पास केंद्रावर सदरील बससेवेचे तिकिट बुकींग करण्यात येते.
- सदरील बससेवेस ज्या दिवशी प्रवाशांचा अल्प प्रतिसाद लाभेल तसेच काही अपरिहार्य कारणास्तव सदरची बससेवा रद्द झाल्यास त्या प्रवाशांना इतर दिवशी (त्यापुढील आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टी) प्रवास करण्याची मुभा राहील.
- सदरील बससेवेचे ज्या दिवशी बुकींग केले असेल त्या दिवशी सदर प्रवासास राहत्या घरापासून बस सुटण्याच्या ठिकाणापर्यंत व सायंकाळी पोहचल्यानंतर त्यांना त्यांच्या राहत्या घरापर्यंत सदरील तिकिटावर अन्य मार्गाच्या बसेसमधून प्रवास करण्याची मुभा राहील.
- प्रवाशांना मार्गदर्शन करण्याकरिता प्रत्येक बसमध्ये गाईड सेवकाची
परिवहन महामंडळामार्फत प्रासंगिक करारावर बससेवा
प्रत्येक आठवडयाच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सिंहगड रोडवरील कृष्णाई वॉटर पार्क व लोणावळा रोडवरील इमेजिका वॉटर पार्क येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीकरीता परिवहन महामंडळामार्फत प्रासंगिक करारावर बसेस देण्यात येतात. सदरच्या बुकिंग करीता ०२० २४५०३३०० या क्रमांकावर संपर्क साधावा.
