Sunday, June 7, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

खर्गेंच्या टीकेवरून मोदींवरचा द्वेष दिसतो – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो. मात्र, खर्गे यांनी विनाकारण वैयक्तिक आरोग्याच्या विषयात नरेंद्र मोदी यांना ओढले आहे, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खर्गे यांच्या विधानावर पलटवार केला.

जम्मू कश्मीर मधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून हटवल्याखेरीस मरणार नाही असे विधान केले होते. या विधानाचा अमित शहा यांनी समाचार घेतला.

काँग्रेस नेत्यांच्या मनात पंतप्रधान मोदी यांच्या बद्दल किती प्रमाणात द्वेष आणि भीती आहे हेच खर्गे यांच्या विधानावरून दिसून येते, असे शहा म्हणाले. वास्तविक पंतप्रधान मोदी, मी आणि आम्ही सगळे खर्गे यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो. त्यांना उत्तम आरोग्य लाभावे. सन 2047 मध्ये विकसित भारत त्यांना बघायला मिळावा, अशी आमची इच्छा आहे, असे अमित शहा यांनी नमूद केले.

आपण जम्मू कश्मीरला वाऱ्यावर सोडणार नाही. जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळेपर्यंत आपण लढत राहणार. माझे वय 83 वर्ष आहे. मात्र, मोदींना सत्तेवरून हटवल्याखेरीज आपण मरणार नाही. जम्मू काश्मीरच्या नागरिकांची बाजू ऐकत राहणार. त्यांच्यासाठी लढत राहणार, असे खर्गे जाहीर सभेत बोलले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अकारण जम्मू-काश्मीरच्या युवकांबद्दल कळवळा दाखवत आहेत. वास्तविक मोदी यांच्यात दहा वर्षाच्या कार्यकाळात देशभरातील युवकांचे भवितव्य अंधारले आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading