अरबाजच्या ‘बिग बॉस मराठी’मधील एक्झिटमुळे निक्कीचा झाला आहे इमोशनल ब्रेकडाऊन
Bigg Boss Marathi Day 58 : ‘बिग बॉस मराठी’ हा सीझन प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. पण या सीझनमधील एका जोडीने मात्र प्रेक्षकांचं चांगलच लक्ष वेधून घेतलं आहे. ही जोडी म्हणजे निक्की आणि अरबाज. आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील अरबाजचा प्रवास संपला आहे. अरबाजचा प्रवास संपल्याने निक्की मात्र खूव भावूक झालेली पाहायला मिळत आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये, निक्कीला अरबाजची खूप आठवण येत असल्याचं पाहायला मिळत आहे. निक्की म्हणतेय,”अरबाज तू मला सोडून कुठे गेला आहेस?”. पुढे अरबाजच्या नावाचाच कॉफी कप निक्की वापरताना दिसत आहे. निक्की म्हणतेय,”मी घरात तुझ्या नावाचा कप घेतला आहे…पण तुच नाही आहेस आज”. जान्हवी पुढे म्हणतेय,”ही राणी पूर्ण हल्ली आहे”.
अंकिता म्हणतेय,”आपल्यावरही ‘ती’ वेळ येणार”.
‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात अंकिता, सूरज, पॅडी आणि डीपी दादा चर्चा करताना दिसत आहे. अंकिता म्हणतेय,”काल निक्की आणि अरबाजवर जी वेळ आली ती आपल्यावरही येणार”. डीपी दादा पुढे म्हणतात,”आता दिवस कमी राहिले आहेत”.
‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर
ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM
