Sunday, June 14, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

बडोद्यातील संकल्पभुमी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक लवकरच उभारले जाईल – रामदास आठवले

बडोदा :  महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी बडोदा संस्थानातील नोकरी सोडल्यानंतर 23 सप्टेंबर 1917 रोजी सयाजी गार्डन मधील वृक्षाखाली बसुन अस्पृश्यता निवारणाचा संकल्प केला होता. समाजाला न्याय हक्क मिळवुन देईल. समजात समता स्थापन करण्याचा संकल्प केला होता. त्या ऐतिहासीक स्थळाला संकल्प भुमि म्हणून आंबेडकरी जनता दरवर्षी नतमस्तक होते. बडोद्यातील सयाजी गार्डन मधील या संकल्पभुमिला दरवर्षी 23 सप्टेंबरला देशभरातुन आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने अभिवादनासाठी एकत्र येते.
या संकल्पभुमिला 107 वर्ष झाली असून
संकल्पभुमी ही देशभरातील आंबेडकरी जनतेसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे संकल्प भूमी जवळ गुजरात राज्य सरकारच्या वतीने महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक 27 कोटी खर्च करुन उभारण्यात येत आहे. येत्या डिसेंबर पर्यंत हे स्मारक पूर्ण होईल. या स्मारकात लाईट आणि म्युझीक शो सुरु करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने 10 कोटीचा निधी मिळवुन देण्यासाठी आपण प्रयत्न करु तसेच गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनाही आपण या स्मारकात लाईट अॅन्ड म्युझीक शो सुरु करण्यासाठी 10 कोटीचा निधी देण्यासाठी पत्र पाठवणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांनी केले. देशभरातील आंबेडकरी जनतेला प्रेरणादायी असणा-या संकल्पभुमि येथे डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक लवकर उभारले जाईल.हे स्मारक चार मजल्यांचे असून त्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे स्मारकातील सजावटी चे अंतर्गत काम वेगाने पूर्ण करण्यात येत आहे .या स्मारकात महामानव

डॉ. बाबसाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे .यात स्मारकात सभागृह आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा चित्रमय जीवनपट; मेडीटेशन सेंटर चा स्मारकात समावेश आहे.येत्या डिसेंबर मध्ये संकल्पभूमी स्मारक काम पूर्ण होणार आहे.या स्मारकात लाईट अँड साऊंड शो ची उभारणी करण्याठी 10 कोटींचा खर्च असून हा खर्च केंद्र सरकार पर्यटन मंत्रालय आणि गुजरात राज्य सरकार कडून मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ना.रामदास आठवले यांनी सांगितले.

यावेळी संकल्पभूमी सयाजी गार्डन बाहेर रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या पुढाकारातून संकल्पभूमिला भेट देण्यास आलेल्या आंबेडकरी अनुयायांना मोफत अन्नदान करण्यात आले त्या स्थळाला ना. रामदास आठवले यांनी आज भेट दिली.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे गुजरात राज्य अध्यक्ष अशोककुमार भट्टी, प्रभारी जतीन भुट्टा,लीलावतीबेन वाघेला, बडोदा जिल्हा अध्यक्ष राजेश गोयल,

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading