Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

खासदार सुप्रिया सुळे भावी मुख्यमंत्री तर योगेंद्र पवार फिक्स आमदार बारामतीत झळकले बॅनर

पुणे: प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे या राज्याच्या भावी मुख्यमंत्री असतील तर शरद पवार यांचे नातू आणि युवा नेते योगेंद्र पवार हे भावी आमदार असतील, असा दवा करणारे फलक बारामती शहरात झळकले आहेत. 

राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला तरीही राजकीय पक्ष आणि प्रशासन देखील निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. त्याचप्रमाणे सर्वसामान्य कार्यकर्ते आणि मतदार यांच्यातही निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. 

याचाच परिणाम म्हणून बारामती शहरात सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांचे फलक झळकले आहेत. गुणवडी चौकात ईद निमित्त नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी उभारलेल्या फलकांवर वरील आशयाचा दावा करण्यात आला आहे. फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीने हे फलक प्रसिद्ध करण्यात आले आहेत. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading