Sunday, June 7, 2026
ENTERTAINMENTLatest News

घरात कोणाला समजणार अंड्याचा फंडा, अरबाज आणि निक्कीमध्ये होणार का राडा?

Bigg Boss Marathi Day 54 : ‘बिग बॉस मराठी’च्या आजचा भाग खूपच रंजक असणार आहे. या आठवड्याची थीम ‘जंगलराज’ अशी आहे. सोमवारच्या भागात या थीमनुसार घरातील सदस्यांना ‘शिकाऱ्याची बंदूक’ हा नॉमिनेशन टास्क देण्यात आला होता. आता आजच्या भागात घरात कोणाला अंड्याचा फंडा समजणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये,”कॅप्टन पदाची उमेदवारी मिळवण्यासाठी दुसऱ्या सदस्यांच्या घरट्यात अंड ठेऊन बाद करायचे आहे”, असं म्हटलं जात आहे. अरबाज पुढे म्हणतोय,”पहिल्या फेरीत अरबाज आणि अभिजीतला काढू”. पुढे अरबाज आणि निक्कीमध्ये जोरदार राडा झालेला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात कॅप्टनसी टास्क पार पडणार आहे. या आठवड्यात घराला कॅप्टन नव्हता. पण आता या टास्कमध्ये कोण विजयी होत कॅप्टन होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

BIGG BOSS मराठी, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर

ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading