Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आपण पुन्हा उपोषण सुरू करणार असून हे आंदोलन ही राज्य सरकारला शेवटची संधी – मनोज जरांगे पाटील

जालना:  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपण पुन्हा उपोषण सुरू करणार असून हे आंदोलन ही राज्य सरकारला शेवटची संधी असेल. यावेळी देखील मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. 

मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून आरक्षण मिळावे, आरक्षणात सगेसोयऱ्यांचा समावेश व्हावा, हैदराबादसह तीन गॅझेट प्रमाण मानावे, या प्रमुख मागण्यांसाठी जरांगे पाटील आज रात्री बारा वाजल्यापासून पुन्हा उपोषण सुरू करणार आहेत. त्यापूर्वी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारला अनेक इशारे दिले. 

यापुढे करणार नाही राजकीय भाष्य  

आपण पुन्हा उपोषण सुरू करणार असून केवळ मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच आपली मागणी आहे. आपल्याला राजकारण करण्यात कोणताही रस नाही. मात्र, आम्ही राजकारण करू नये अशी इच्छा असेल तर आमच्या मागण्या मान्य कराव्या. आम्हाला निवडणुकीची काही देणे घेणे नाही. त्यामुळे इथून पुढे आपण कोणतेही राजकीय भाष्य करणार नाही, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. 

धनगर समाजाच्या मागणीला पाठिंबा

धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातींमध्ये भावा, या मागणीसाठी पंढरपूर येथे उपोषण सुरू आहे. या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने धनगर, धनगड, धनखड एकच असल्याचा शासकीय आदेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे जरांगे पाटील यांनी स्वागत केले आहे. धनगर समाजाच्या या मागणीला मराठा समाजाने पाठिंबा द्यावा, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले आहे. ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ हे दंगली घडविण्याच्या विचारात असून त्यांच्याशी भांडण ओढवून घेऊ नका, असा सल्लाही त्यांनी धनगर समाजाच्या नेत्यांना दिला आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading