Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATECHNOLOGY

काँग्रेसच्या पोटात आरक्षणाबाबत जे मत आहे तेच राहुल गांधी यांच्या ओठावर आले – चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई:  काँग्रेसच्या पोटात आरक्षणाबाबत जे मत आहे तेच त्यांचे नेते राहुल गांधी यांच्या ओठावर आले आहे. काँग्रेस हीच आरक्षणाची खरी मारेकरी आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. 

योग्य वेळी आरक्षण संपुष्टात आणण्याचा विचार करू. अध्यापची वेळ आलेली नाही, असे विधान लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यात केले होते. त्यावरून विरोधककडून गांधी यांना टीकेचे लक्ष केले जात आहे. त्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची या विषयावर टीका करताना जीभ घसरली आहे. त्यांनी गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखाचे इनाम जाहीर केले आहे. त्यांच्या या विधानावर बावनकुळे प्रतिक्रिया व्यक्त करीत होते. 

गायकवाड यांच्या या विधाने भाजप व समर्थन करीत नाही, असे सांगत बावनकुळे यांनी हात वर केले. मात्र, राहुल गांधी यांच्या वक्तव्यातून काँग्रेसच्या पोटातील मळमळ बाहेर पडली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी संविधान बदलणार अशी अवयव उठवणाऱ्या काँग्रेसचे खरे रूप उघड झाले आहे, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading