समरसता आरती संपन्न
पुणे : मानाचे पाच गणपती तसेच दगडूशेठ हलवाई गणपती, मंडई गणपती येथे समाजातील वंचित कुटुंबाकडून आरती तसेच त्यांचा चांदीची गणेश प्रतिमा देवून सन्मान करण्यात आला. समरसता गतीविधी पुणे शहर व पाश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या तर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी 40 पेक्षा जास्त कुटुंबीय उपस्थित होते. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या पाहिल्या सार्वजनिक गणेशोत्सव विंचूरकर वाडा, कुमठेकर मार्ग सदाशिव पेठ पुणे येथे सर्वांच्या हस्ते सामुहिक आरती करण्यात आली. या प्रसंगी विविध मान्यवरांनी समाजात समरसतेची आवश्यकता का आहे या बद्दल मत व्यक्त केले.
या वेळी प्रमुख उपस्थिती मध्ये ह. भ .प . नारायण महाराज गोसावी ( सोपानदेव संस्थान), मा.अनिल भस्मे, मा.शिरीष मोहिते (माजी अध्यक्ष पुणे पीपल्स बँक) मा. राजेंद्र बलकवडे, (अध्यक्ष दगडूशेठ दत्त मंदिर) मा. संगीता ठकार (मा. अध्यक्ष कसबा गणपती). मा.रविन्द्र पाठारे (अध्यक्ष विंचूरकर वाडा गणपती मंडळ) नंदू जाधव (अध्यक्ष दुर्गम प्रतिष्ठान) प्रा.डॉ. डी. डी. कुंभार (उपप्राचार्य फर्ग्युसन कॉलेज) प्रसाद लवळेकर (रा.स्व. संघ पुणे शहर संपर्कप्रमुख), विकास जाधव – संचालक खादी ग्रामोद्योग, अनिल भसमे, प्रकाश पायगुडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित काही कुटुंबीयांनी जीवनात प्रथमच अशी गणेशाची आरती करता आली तसेच असा सामाजिक सन्मान झाल्याबद्दल मनापासून आभार मानले.
या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. प्रसाद खंडागळे, रवि ननावरे, शरद शिंदे समरसता गतीविधी पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी यांनी केले.
