Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRA

मुलुंड हिट अँड रन घटना,खा. संजय दिना पाटील यांनी घेतली कुटुंबीयांची भेट,

 

मुंबई – मुलुंड पुर्व गव्हाणपाडा येथील हिट अँड रन घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या प्रितम थोरात याच्या कुटुंबियांची भेट ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील, विक्रोळीचे शिवसेनेचे आमदार सुनिल राऊत व भांडुपचे आमदार रमेश कोरगावकर यांनी घेऊन त्यांचे सांत्वन केले. या प्रकरणात आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी त्यांनी परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांची भेट घेतली. त्यानंतर या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रसाद पाटील याची ज्युपिटर रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

मुलुंड पुर्व या ठिकाणी गणपती मंडळाचे बॅनर लावण्यासाठी प्रितम थोरात व प्रसाद पाटील हे शिडीवर चढले होते. त्यावेळी भरधाव वेगाने येणा-या बीएमडब्ल्यू कारने शिडीला धडक दिली. त्यात प्रितम थोरात याचा जागीच मृत्यू झाला तर प्रसाद पाटील याला ज्युपिटर रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करीत कारचालक शक्ती अलग याल अटक केली.

या घटनेनंतर मुलुंडचा राजा गणपती उत्सव मंडळावर दुखाचे सावट पसरले. खासदार संजय दिना पाटील यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांची तसेच प्रितम थोरात व प्रसाद पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार सुनिल राऊत व रमेश कोरगावकर उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading