बडोदा बीएनपी परिबा लार्ज अँड मिड कॅप फंड साजरा करतोय संपत्तीनिर्मितीची चार वर्ष
मुंबई : बडोदा बीएनपी परिबा ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आपल्या बडोदा बीएनपी परिबा लार्ज अँड मिड कॅप फंडाचा चौथा वर्धापन दिन सप्टेंबरमध्ये साजरा करत आहे. फंडाने आपल्या सुरुवातीपासूनच आधारभूत निदेशांकापेक्षा म्हणजेच बेंचमार्क इंडेक्सपेक्षाही सरस कामगिरी बजावताना गुंतवणूकदारांसाठी सक्रियरित्या संपत्तीची दमदार निर्मिती केली आहे. या फंडात शुभारंभापासून 10,000 रुपयांची मासिक एसआयपी केली असती तर, या एसआयपीचे मूल्य 31 ऑगस्ट 2024 रोजी 8.51 लाख रुपये इतके असते.
| योजना /आधारभूत निर्देशांक | 1–वर्षातील परतावा | 3–वर्षातील परतावा | आरंभापासून |
| बडोदा बीएनपी परिबा लार्ज अँड मिड कॅप फंड | 49.78% | 22.04% | 29.84% |
| बीएसई 250 लार्ज मिडकॅप टोटल रिटर्न इंडेक्स | 40.31% | 18.16% | 26.271% |
गत चार वर्षापासून कार्यरत असलेल्या या योजनेने आधारभूत निर्देशांकापेक्षा कमी बीटा राखला आहे, तसेच या फंडाच्या अन्य समवयस्क गटाच्या सरासरीपेक्षा अधिक परतावा दिलेला आहे. याचा अर्थ, या योजनेने तेजीच्या कालावधीत आधारभूत निर्देशांकाला कामगिरीत मागे टाकले आहे, तसेच बाजारातील घसरणीच्या पेचप्रसंगावेळी आपल्या गुंतवणूकीला उत्तम संरक्षण प्रदान केले आहे. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) मधील गुंतवणूकदारांना गेल्या वर्षभरात 53 टक्के तर फंडाच्या स्थापनेपासून 32.04 टक्के परतावा मिळालेला आहे.
ही योजना लार्ज-कॅप आणि मिड-कॅप समभागांमध्ये धोरणात्मकदृष्ट्या प्रत्येकी किमान 35 टक्के निधी गुंतवतो, तर उत्तम संधी मिळताच शिल्लक निधी स्मॉल-कॅप समभाग आणि रोख पर्यांयामध्ये गुंतवते. अशाप्रकारे हा फंड प्रस्थापित आणि उदयोन्मुख कंपन्यांमध्ये गुंतवणूकीचे संतुलन साधण्यावर अधिकाधिक भर देतो.
बडोदा बीएनपी पारिबा लार्ज अँड मिड कॅप फंड गुंतवणूकदारांना विशिष्ट बाजारपेठांमध्ये आघाडीवर असू शकणाऱ्या किंवा भविष्यात संभाव्य लार्ज कॅप बनण्याची ताकद असलेल्या प्रस्थापित आणि उदयोन्मुख कंपन्यांमध्ये गुंतवणूकीची संधी प्रदान करतो. 2006 पासून, शेअरबाजार टप्प्याटप्प्याने वाटचाल करत आहे. काही वेळा लार्ज कॅप्स समभागांनी उत्तम कामगिरी बजावली आहे, तर काही वेळा मिड-कॅप्स समभागांनी चमकदार कामगिरी केलेली आहे. एक आणि तीन वर्ष या दोन्ही कालावधीत पायाभूत निर्देशांक विरुद्ध फंडाने निवडलेल्या समभागांची जोरदार कामगिरी यातून फंडाची अल्फारुपी गुरुकिल्ली सिध्द होते.
आधारभूत निर्देशांकात समाविष्ट असलेल्या 250 कंपन्या विविध क्षेत्रांमध्ये वैविध्यता प्रदान करतात. त्यामुळे फंडाच्या व्यवस्थापकाला एक अत्युत्तम आणि जोखीम-समायोजित पोर्टफोलिओ साकारण्याची संधी मिळते. विविध आर्थिक आणि क्षेत्रीय प्रवाहांमध्ये फंडाच्या गुंतवणूकीत समतोल राखण्यास ही वैविध्यता मदत करते. त्यामुळे गुंतवणूकदारांना एक सक्षम गुंतवणूक पर्याय प्राप्त झालेला आहे.
40 ते 60 समभागांचा वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तयार करण्याच्या उद्देशाने फंड घराण्याने क्षेत्रनिहाय गुंतवणूकीसाठी शिखर ते तळ दृष्टिकोन तर समभाग निवडीसाठी तळ ते शिखर दृष्टिकोन या दोन्ही दृष्टीकोनांचे एकत्रीकरण करत त्याचा अतिशय चपखल वापर केला आहे, लार्ज कॅप्समध्ये फंडाची गुंतवणूक टीम वाजवी किंमतीत उच्च-गुणवत्तेच्या समभागांवर लक्ष केंद्रित करते, तर मिड-कॅप्समध्ये उच्च-वाढ आणि उच्च-संभाव्य परताव्याच्या संधी साधते.
बडोदा बीएनपी परिबा लार्ज अँड मिड कॅप फंड आपल्या वाटचालीचे चौथे वर्ष साजरे करत असताना, तो “टूगेदर फॉर मोअर” हे ब्रँड अभिवचनसुध्दा साजरे करत आहे. हे अभिवचन म्हणजे सातत्यपूर्ण परतावासाठी फंड घराण्याची असलेल्या वचनबद्धतेचा आणि नाविन्यपूर्ण गुंतवणूक धोरणांचा एक प्रकारे दाखला असून संपत्ती निर्मितीसाठी संतुलित दृष्टिकोन बाळगणाऱ्या गुंतवणूकदारांनी या फंडाला निवडीसाठी नेहमीच प्राधान्य दिलेले आहे.
