‘बिग बॉस मराठी’च्या घरात होणार सीझनची पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री! कोण आहे हा नवा सदस्य?
Bigg Boss Marathi Day 43 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. दुसऱ्या आठवड्यापासूनच या सीझनमध्ये कोण वाईल्ड कार्ड सदस्य सहभागी होणार याकडे बिग बॉसप्रेमींचं लक्ष लागलं होतं. वाईल्ड कार्ड सदस्याबद्दल अनेक नावे समोर आली. आता बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात खरचं वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार का? घरात कोण सदस्य येणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
‘बिग बॉस मराठी’चा आजचा प्रोमो सर्वांनाच विचार करायला भाग पाडणारा आहे. प्रोमोमध्ये, तो आहे मर्द रांगडा आणि मनाचा राजा…अस्सल फौलाद घालणार ‘बिग बॉस’च्या घरात राडा, असं म्हटलं गेलं आहे. त्यामुळे अरबाज, वैभवला टक्कर देणारा हा नवा सदस्य कोण? या प्रश्नाचं कोडं आज सुटणार आहे.
गेल्या आठवड्यात बी बी करन्सीसाठी आणि बी बी फार्ममध्ये सदस्यांनी घातलेला राडा, नियमांचं उल्लंघनाबद्दल रितेश भाऊने सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. छोटा पुढारी घन:श्याम दरवडेने या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेतला. आता नव्या सदस्याच्या येण्याने बिग बॉसच्या घरात काय बदल घडणार हे पाहावे लागेल.
‘BIGG BOSS मराठी’, भाऊचा धक्का, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर
ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #BhauchaDhakka
