Sunday, June 7, 2026
ENTERTAINMENTLatest News

“निक्की कधीच कॅप्टन होऊ शकत नाही”; रितेश भाऊने दिली दादागिरीची मोठी शिक्षा

Bigg Boss Marathi Day 42 : ‘बिग बॉस मराठी’च्या गेल्या आठवड्यात काही सदस्यांचं वागणं पाहून प्रेक्षक नाराज झाले. त्यांना चिड आली. आज भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ या सर्व गोष्टींवर बोलताना दिसणार आहे. गणपती स्पेशल भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ निक्कीच्या कारनाम्यावर आवाज उठवताना दिसणार आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ निक्कीला मोडलेल्या स्टुलवर बसवत तिला तिची जागा दाखवून देणार आहे.

रितेश भाऊ निक्कीला म्हणतोय,”या आठवड्यात निक्कीने विनाकारण घर डोक्यावर घेतलंय. प्रत्येक सदस्याला त्रास दिलाय. तुम्ही महाराष्ट्रातल्या 11 कोटीपेक्षा जास्त प्रेक्षकांना त्रास दिलाय. असं सगळं करुन लोकांचं मनोरंजन होतं असं तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. निक्की तुम्हाला बिग बॉसची, प्रेक्षकांची किंमत नाही. घरातील सदस्यांची तुम्ही किंमत ठेवत नाही. बिग बॉसचे नियम वेगळे आणि तुमचे वेगळे आहेत. तुम्ही स्वत;ला क्वीन मानता…पण या आठवड्यात तुम्ही सर्वांची झोकून माफी मागायला पाहिजे”.

रितेश भाऊ पुढे म्हणतोय,”निक्की तुम्हाला कॅप्टन म्हणून मिरवायला आवडतं. तुम्हाला जी कॅप्टन रूम आवडते ना त्याबद्दल इथूनपुढे संपूर्ण सीझनभर तुम्ही कधीही कॅप्टन होणार नाही. मी तुमच्या कॅप्टनसीसोबत तुमची इम्युनिटीपण काढून घेत आहे. आठवडाभर घरातील सर्व भांडी तुम्ही एकटीने घासायची आहेत. तुम्ही जर भांडी घासली नाही तर बिग बॉस पुढच्या आठवड्यात थेट नॉमिनेट करतील. अशाप्रकारची दादागिरी मी खपवून घेणार नाही. कारण हे माझं घर आहे”.

‘BIGG BOSS मराठी’, भाऊचा धक्का, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर

ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #BhauchaDhakka

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading