‘भाऊच्या धक्क्या’वर सदस्यांना बसणार जबरदस्त शॉक; वर्षा ताईंच्या कल्ल्याने वेधणार लक्ष
‘भाऊच्या धक्क्या’वर आज सदस्यांना जबरदस्त शॉक बसणार आहे. माणसं ओळखायला चुकल्याने सदस्यांना हा शॉक बसणार आहे. रितेश सदस्याला प्रश्न विचारतो. त्या प्रश्नाचं उत्तर जर चुकलं तर त्या सदस्याला शॉक दिला जातो.’भाऊच्या धक्क्यावर’ रितेश भाऊ अंकिता आणि वर्षा ताईंना प्रश्न विचारतो की, वर्षा ताई सध्या घरात कोणत्या सदस्याबद्दल जास्त बोलतात?. अंकिता आणि वर्षा ताईंचं जर सारखं उत्तर आलं नाही तर त्यांना शॉक देण्यात येतो. वर्षा ताईंनी निक्कीचं नाव लिहिलेलं असतं तर अंकिताने डीपी दादाचं नाव लिहिलेलं असतं. उत्तर चुकल्यामुळे वर्षा ताई अंकिताला म्हणतात,”सगळी जनता निक्कीबद्दल बोलते एवढी तरी सामान्य ज्ञान तुला असायला हवं”. उत्तर चुकल्याने वर्षा ताई चांगलाच कल्ला करतात. त्यांचा कल्ला घरातील सर्व सदस्यांचं लक्ष वेधून घेतो. तसेच शॉकदरम्यान घन:श्यामची उडालेली तारांबळ पाहणं उत्सुकतेचं ठरत आहे.
‘BIGG BOSS मराठी’, भाऊचा धक्का, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर
ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #BhauchaDhakka
