कोणी प्रेमाला ठोकर मारणार तर कोणी पस्तावणार, घरात नवीन समीकरण तयार होणार?
Bigg Boss Marathi New Season Day 32 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नात्यांची समीकरण कधी बदलतील हे सांगू शकत नाही. कोणी कधी प्रेमाला ठोकर मारतं तर कोण पस्तावतचं. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नेहमीच नात्यांची नवी समीकरण तयार होतात. आता निक्की, अरबाज, अभिजीत यांच्याबाबतीतही नात्यांची नवी समीकरण तयार झालेली पाहायला मिळत आहेत.
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये सूरज आणि आर्या निक्की, अरबाज, अभिजीत यांच्यातील नात्यांवर एक खास गाणं म्हणताना दिसून येत आहेत. त्यावर घरातील इतर सदस्यही मजा घेताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज चांगलाच माहोल बनणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मात्र मनोरंजनाची मेजवानी मिळेल.
निक्कीने टीम A ला रामराम केल्यानंतर तिला आता अभिजीतचा चांगलाच पाठिंबा मिळत आहे. आता किती दिवस निक्की आणि अभिजीतची जोडी एकत्र दिसेल याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. पण त्यांची दिल दोस्ती दुनियादारी मात्र लक्ष वेधून घेत आहे.
‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर
ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM
