Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

दि पुणे पोस्टस् अँड टेलिकॉम को -ऑप. क्रेडिट सोसायटी तर्फे स्वातंत्र्यदिन साजरा

पुणे : दि पुणे पोस्टस् अँड टेलिकॉम को -ऑप. क्रेडिट सोसायटी लि. पुणे या संस्थेच्या मुख्य कार्यालय जी. पी. ओ. कंपाऊंड, पुणे येथे संस्थेचे सन्मान्य चिटणीस श्री. गणेश भोज यांच्या शुभहस्ते ध्वजरोहाणाचा कार्यक्रम पार पडला.

संस्थेचे बहुसंख्य सभासद या ध्वजवंदन कार्यक्रमास उपस्थित होते.

ही संस्था फक्त सभासदांना अल्प दरात कर्जपुरवठा करते शिवाय संस्थेतर्फे सामाजिक अनेक उपक्रम राबवले जातात. सभासदांसाठी अनेक कल्याणकारी योजना जसे, कन्यादान योजना, संस्थेची लेक योजना, दिनदर्शिका प्रकाशन, प्रतीवर्षी गुणवंत विद्यार्थी व गुणवंत कामगार सत्कार, दुर्धर आजारासाठी सभासदांना वैद्यकीय मदत, समारंभासाठी अत्याधुनिक सुविधासह सुसज्ज असा एमरल्ड हॉल सभासदांसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध होत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading