Sunday, June 21, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवाद साधणार

 

लाडकी बहिण योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपचं अभियान

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

राखी पौर्णिमेच्या निमित्तानं 18 ऑगस्ट रोजी राज्यातील बहिणींशी संवाद

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून यासंदर्भात काय म्हटलंय पाहुयात

महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणी साधणार आपल्या लाडक्या देवाभाऊंशी संवाद!

स्त्रीसक्षमीकरण हा ध्यास घेऊन केंद्रातील मोदी सरकार, राज्यातील महायुती सरकार व विशेषतः भारतीय जनता पार्टी अहोरात्र मेहनत घेत आहे. विविध योजना व उपक्रमांच्या द्वारे स्त्रीला सशक्त करण्याचे काम पक्ष व सरकारद्वारे आम्ही करत आहोत.

येत्या राखी पौर्णिमाला 18 ऑगस्ट रोजी राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस “लाडक्या बहिणींचा देवाभाऊ” या उपक्रमाद्वारे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत. राज्यातील सर्व माता – भगिनींना विनंती आहे की, आपण सर्वांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. तसेच, माझी भाजपा कार्यकर्त्यांना विशेषतः भाजपा महिला मोर्चाला विनंती आहे की, या उपक्रमाची जबाबदारी घेऊन आपण जास्तीत जास्त महिलांना या उपक्रमात सहभागी करून घ्यावे.

 

https://x.com/cbawankule/status/182320245 5733322205?s=46

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading