Sunday, June 7, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

भाजपचे ओम बिर्ला पुन्हा एकदा लोकसभा अध्यक्षपदी

दिल्ली : भाजपचे ओम बिर्ला यांची आज पुन्हा एकदा लोकसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. इंडिया आघाडीचे उमेदवार के सुरेश यांचा पराभव करून ते दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदी विराजमान झाले. बिर्ला यांनी मागील लोकसभेतही सभापती म्हणून काम पाहिले होते. तसेच मागील 25 वर्षांत दुसऱ्यांदा लोकसभा सभापती पद मिळवणारे ते पहिले खासदार ठरले आहेत. राजस्थानमधील कोटा येथून बिर्ला हे तिसऱ्यांदा लोकसभेत परतले आहेत. यावेळी कोटा येथील जागा बिर्ला यांनी 41,139 पेक्षा जास्त मतांच्या फरकाने जिंकली आहे.  

लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी संसदेत आवाजी पद्धतीने मतदान घेण्यात आले. ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू हे ओम बिर्ला यांच्यासमवेत अध्यक्षस्थानी गेले.   

https://x.com/ANI/status/1805840902184910935

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading