सासरी पहिल्या दिवशी वसुंधरेशी कोणी मागितले वचन ?
‘पुन्हा कर्तव्य आहे’ मध्ये नुकतंच ‘आकाश आणि वसूचा’ लग्न सोहळा पार पडला. वसुंधराने, बनी सोबत आपल्या सासरी गृह प्रवेश केला. कधी ना पाहिलेला असा गृह प्रवेश सगळ्यांनी पाहिला. लग्नाच्या पहिल्या रात्री आकाश -वसुनी एक मोठा निर्णय घेतलाय, ते म्हणजे चिनू-मनू ,बनीसाठी आपण वेगळ्या खोलीत आपल्या मुलांसोबत झोपायचा. हे सगळं होत असताना वसूच मन तिला खातय कारण तिने आकाश पासून आपल्या पहिल्या नवऱ्याचे सत्य लपवलंय. सासरी पहिल्या वसुला सतत फोनवर पाहून तिला ह्या घरात लक्ष द्यायला सांगते. लवकरात लवकर चिनू-मनूच्या आईची जबाबदारी उचलून आकाशसोबत ही आपलं एक प्रेमाचं नातं तयार करून सुखी संसाराचं वचन मागते. वसूचा लग्नानंतरचा प्रवास आताच सुरु झाला आहे आणि तिच्यावर इतक्या कर्तव्यांची लिस्ट आली आहे. आता कसं निभावलं वसु हे नवीन नातं आणि काय होईल जेव्हा ती आकाशला आपल्या पहिल्या नवऱ्याचं सत्य सांगेल? हे सगळं जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका ‘पुन्हा कर्तव्य आहे’ दररोज रात्री ९:३० वा फक्त आपल्या झी मराठीवर.
