Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

डॉ. कोल्हे यांच्या ‘त्या’ टीकेला आढळराव पाटलांचे सडेतोड उत्तर

पुणे : गेल्या काही दिवसापासून शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच मंत्री छगन भुजबळ यांना नाशिक ऐवजी शिरूरमधून उमेदवारी देण्याबाबत डोक्यात होतं. मात्र भुजबळांनी नकार दिल्याने त्याठिकाणी शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असा दावा विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. त्यावर आता आढळराव पाटील यांनी कोल्हेंवर पलटवार केलाय.

महायुतीचे उमेदवार जरी चार पक्षांमध्ये बेडूक उड्या मारून गेले असले तरीसुद्धा पहिल्या पंसतीचे उमेदवार छगन भुजबळ होते. भुजबळांना शिरूरमधून उमेदवारी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात होतं. परंतु भुजबळांनी नकार दिल्याने आढळरावांनी उमेदवारी मिळाली आहे. ज्यांना 2019 मध्ये हिम्मत असेल तर समोर लढून दाखवा असं आव्हान संसदेच्या प्रांगणात उभे राहून देत होते. त्यांच्याच वळचळनीला जाऊन आज उमेदवारी घ्यावी लागली. असा टोला अमोल कोल्हे यांनी आढळरावांना लगावला.

अमोल कोल्हे यांनी केलेल्या टिकेला आता आढळरावांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अमोल कोल्हे प्रसिद्धीसाठी काहीही बोलत सुटले आहेत. कोल्हे आणि संजय राऊत हे काही विधान करतात. त्याला काहीही अर्थ नसतो. मंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादीत आहेत तर त्यांची उमेदवारी मुख्यमंत्री कसे जाहीर करणार असा सवाल करत कोल्हे हे आता आपला अज्ञाणपणा बालिशपणा दाखवत आहेत. संजय राऊत यांच्यासोबत राहून त्यांची त्यांना शिकवण मिळाली आहे. राऊतांसारखी त्यांनी सकाळी उठून काहीही बडबड करू नये. असा सल्ला देखील आढळरावांनी कोल्हेंना दिला.

दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघात देखील ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत. मुख्यमंत्र्यांनी देखील मला शिरूरमधून निवडणुक लढविण्यासाठी विचारणा केली होती. आता सगळीकडे भाषण करत असतो. त्यामुळे माझा संबंध सगळीकडे येतो. परंतु नाशिकमध्ये मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक जण मला नाशिकमधून उभं राहण्यासाठी विनंती करीत आहेत. कदाचित नाशिकमधून उभा राहिलो तर निवडून पण येईन असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केलाय.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading