fbpx
Sunday, May 19, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

प्रचंड शक्तीप्रदर्शन करीत आढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल; दिग्गजांची उपस्थिती  

पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघातून आज महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी पक्षाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला. हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मंत्री चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार मेधा कुलकर्णी अशा दिग्गजांची उपस्थिती होती.

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी गुरुवारी सकाळी यांचे लांडेवाडी येथील निवासस्थानी कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आले. त्यानंतर लांडेवाडी येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज, श्री हनुमान आणि श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर ते डेक्कन, पुणे दरम्यान, रॅली काढण्यात आली. त्यानंतर डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यास अभिवादन त्यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.

यावेळी माध्यमांशी बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, गेल्या 20 वर्षांपासून मी शिरूर लोकसभा मतदार संघात कार्यरत आहे. येथील प्रत्येक भागाशी मी अवगत आहे. येथे काय काम करण अपेक्षित आहे? याचे संपूर्ण नियोजन मी केले आहे. मागील पाच वर्षात येथे काय विकास झाला? याचा विचार केला तर विद्यमान खासदाराने येथे काहीही केले नाही. पाच वर्ष पुढे जाण्याऐवजी येथील विकास 10 वर्ष मागे आला आहे. हा ‘बॅकलॉक’ आता मला भरून काढायचा आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading