तर स्थानिकांना रोजगार कधी मिळणार, महागाईने महिला वर्ग त्रस्त – महाविकास आघाडी
मुंबई – धारावी प्रमाणेच मुलुंड डंपिंगची जागाही अदानीला देण्याचा घाट असून आमच्या पक्षात येणारे भ्रष्टाचार मुक्त होतील, असे वक्तव्य भाजप कार्यकर्त्यांनी भांडुप येथे केले. एका खाजगी वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
भांडुप येथील पराग हायस्कुलच्या मैदानावर झालेल्या एका कार्यक्रमासाठी भाजप, शिवसेना (उभाटा), आप, राष्ट्रवादी पक्षांच्या कार्यकर्त्यांना एकाच मंचावर बोलविण्यात आले होते. यावेळी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या.
ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील तसेच भाजप उमेदवार मिहीर कोटेचा हे निवडणुक रिंगणात आहेत. भाजपकडे विकासाचे मुद्दे नसून महागाई, बेरोजगारी व भ्रष्टाचार या मुद्द्यांवर भाजप बोलायला तयार नाही. ज्या मुद्द्यावर ते आश्वासन देत आहेत ते जुमलेच असतील अशी धारणा आता मतदारांची झाली आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते अडचणीत आले असून कोणत्या मुद्द्यावर मत मागण्यासाठी मतदारांकडे जायाचे. हा प्रश्न सर्वांना पडला आहे. ना खाऊंगा ना खाने दुंगा असे बोलणा-यांचाच पक्ष भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. भ्रष्टाचार करणारेच भाजपात गेल्यावर त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना काय बोलावे हे सुचत नव्हते.
ईशान्य मुंबई भागात कोंकण व उत्तर भारतीय लोकांचे प्रमाण जास्त असल्याने संजय दिना पाटील यांनी दहा वर्षांपुर्वीच अयोध्या व कोंकणात जास्त गाड्या सोडण्याची मागणी केली होती. मुंबईचा सर्व कचरा हा ईशान्य मुंबईत येतो. त्यामुळे स्थानिक लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दहा वर्षात भाजपने मुंबईला काय सुविधा दिल्यात. मनोज कोटक खासदार असुनही या भागातील प्रश्न सुटलेले नाहीत. पाणी, आरोग्य, वाहतुक एसआरए साऱख्या मुद्द्यांवर काम झाले नाही. मुलुंड मध्ये सहा नगरसेवक, आमदार, खासदार भाजपचा असूनही मुलुंड मध्ये धारावीकरांचे पुर्नवसन केले जात आहे. मात्र भाजपने या प्रकल्पाला विरोध केला नाही.
मराठी माणसांना मुंबईतच दुय्यम दर्जांची वागणुक दिली जात आहे. मुलुंड पश्चिमेला एका गुजराती सोसायटी मध्ये मराठी माणसाला कार्यालय घेऊ दिले नाही. त्यावर भाजप कार्यकर्ते गप्प बसले. धारावी पुर्नवसन, डंपिंग, पाणी समस्या, वाहतुक कोंडी या सारख्या अनेक मुद्द्यांवर भाजप कार्यकर्ते अडचणीत येत होते.
शिवसेनेने मराठी उमेदवार ईशान्य मुंबईत दिला आहे. मात्र भाजपाकडे मराठी उमेदवार नाही. आमदार, खासदारकीसाठी भाजपकडे मराठी उमेदवार नाहीत का असा प्रश्न महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला. भाजपची सत्ता परत आल्यावर स्थानिक मुलांना रोजगार मिळणार नाही. सर्व उद्योगधंदे, रोजगार गुजरातला जातील असा आरोप महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या वेळी केला.
