Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRA

सुजात आंबेडकरांचा राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा

अमरावती : अमरावती लोकसभेची निवडणूक ही आता चौरंगी होणार हे आज आनंदराज आंबेडकर यांच्या जाहीर सभेवरून दिसून आले. अमरावती शहरातील सायन्स कोर मैदानावर रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तीनही नातू एकाच मंचावर आले.

प्रकाश आंबेडकरांच्या जागी सुजात आंबेडकर होते. या सभेसाठी मोठ्या संख्येने आंबेडकरी लोक एकत्र आले होते. यावेळी भीमराव आंबेडकर यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला तर, सुजात आंबेडकर यांनी भाजपवर ताशेरे ओढले आहेत.

दिल्लीत वसुली भाई, त्यांची बंदूक ईडी-सीबीआय
अमरावतीचे पोट्टे-पोट्टीनो जयभीम म्हणत सुजात आंबेडकरांनी भाषणाला सुरुवात केली. सुजात आंबेडकर म्हणाले, एकच निवडणूक घेणार असे जाहीरनाम्यात आहे, त्यामुळे हे घातक आहे. एक वसुली भाई यांचा दिल्लीत बसलेला आहे आणि त्यांची बंदूक आहे ईडी-सीबीआय.

भाजपला पाडा म्हणजे पाडा :
अमरावतीतसुद्धा निवडणुकीत धार्मिकतेवर प्रचार सुरू आहे, हे आम्ही होऊ देणार नाही. साडी-किराणा म्हणजे रवी राणा असे लहान मुलगा सांगत होता, त्यामुळे मी विनंती करतो की, भाजपला निवडणुकीत मतदान करू नका, त्यांना पाडा म्हणजे पाडा, असे म्हणत सुजात आंबेडकरांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading