fbpx
Monday, June 17, 2024
BusinessLatest NewsPUNE

अझिम प्रेमजी विद्यापीठातर्फे ‘डेव्हलपमेंट लीडरशिप २०२५’ साठी पदव्युत्तर डिप्लोमाचे प्रवेश सुरू

 

पुणे : बेंगळुरूतील अझिम प्रेमजी विद्यापीठाने डेव्हलपमेंट लीडरशीपमध्ये पदव्युत्तर डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हा ११ महिन्यांचा अर्धवेळ (पार्टटाईम) डिप्लोमा असून, नोकरी किंवा व्यवसाय सांभाळून या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे. त्या अनुषंगानेच या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. तीन सत्रांत कॅम्पस आणि ऑनलाईन अशा मिश्र प्रकारात हा अभ्यासक्रम शिकता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मे २०२४ असुन लेखी परीक्षा आणि मुलाखती जून-जुलै २०२४ यादरम्यान होणार असून, ६ जानेवारी २०२५ पासून वर्ग सुरू होणार आहेत.
डेव्हलपमेंट लीडरशीप हा पदव्युत्तर डिप्लोमा अभ्यासक्रम

विकास क्षेत्रातील आठ किंवा त्याहून अधिक वर्षांचा अनुभव असलेल्यांसाठी डिझाईन केला आहे, जे त्यांच्या संस्थांमध्ये मुख्य पदावर आहेत किंवा भविष्यात लवकरच ते या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. विशेषत: सामाजिक संस्था (एनजीओ), सामाजिक चळवळी आणि तळागाळातील संस्थांमध्ये काम करणाऱ्यांसाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना हे शिकता येईल जसे की ऐतिहासिक प्रक्रियांबद्दल विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन अधिक सखोल करणे आणि भारतात विकासाच्या वास्तविकतेचा अनुभव या अभ्यासक्रमाद्वारे घेणे, पर्यायी विकास पद्धती आणि परिणामांची कल्पना करा जे समानता, न्याय आणि टिकाऊपणा वाढवते., सर्वसमावेशक, अनुकूल आणि सहयोगी संस्था तयार करण्यासाठी नेतृत्व क्षमता बळकट करणे आणि आर्थिक व्यवस्थापन, संवाद आणि डेटा विश्लेषणासाठी क्षमता वाढवणे

अझिम प्रेमजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ डेव्हलपमेंटच्या संचालक ऋचा गोविल याबाबत म्हणाल्या, की ‘करिअरच्या मध्यावर असलेल्या आणि विकास क्षेत्रातील वरिष्ठ व्यावसायिकांना या क्षेत्रात काम करण्याचा अनेक वर्षांचा अनुभव असतो. हा अभ्यासक्रम त्यांना विकासाशी संबंधित, कल्पना आणि मार्गक्रमण करण्याचा समृद्ध अनुभव घेण्यास मदत करणार आहे. शिवाय विकास संस्थांचे स्वरूप आणि त्यांचे नेतृत्व करण्यासाठी आवश्यक बाबींचा विचार करण्यास मदत करते’.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading