fbpx
Sunday, May 19, 2024
Latest NewsMAHARASHTRA

…. म्हणून कडवट शिवसैनिक अर्चना पाटील यांच्या मागे पूर्ण ताकदिने उभा – डॉ. तानाजी सावंत

धाराशिव : धाराशिव हा शिवसेनेचा पारंपारीक मतदार संघ. पण केवळ महायुतीचा धर्म पाळण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी हा कडवट शिवसैनिक अर्चनाताई पाटील यांच्या मागे पूर्ण ताकदिने उभा आहे. त्यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी हा तानाजी सावंत छातीचा कोट करून उभा आहे, अशा भावना राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज व्यक्त केल्या.

धाराशिव लोकसभा मंतसंघातून आज माहायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा उमेदवारी अर्ज आज भरण्यात आला. यावेळी आयोजीत प्रचार रॅलीमध्ये तानाजी सावंत बोलत होते. यावेळी राणाजगजीतसिंग पाटील, अर्चना पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार विक्रम काळे आदी उपस्थित होते.

सावंत म्हणाले, धाराशिव लोकसभा मतदारसंघांचा प्रचार हा जानेवारीमध्येच मी सुरू केला आहे. हा मतदारसंघ कडवट शिवसैनिकाचा मतदारसंघ आहे. तरीसुद्धा महायुतीचा धर्म पाळण्यासाठी आम्ही हा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सोडला. मात्र,  ज्या वेळेस पुढच्या व्यासपीठावर येऊ त्यावेळेस समोरच्याचा फडश्या पाडल्याशिवाय मी स्वस्थ  बसणार नाही. अशाच पद्धतीने जर माझ्या शिवसेनेचा एक एक मतदारसंघ कमी होवू लागला तर हा शिवसैनिक कधीही सहन करणार नाही. मात्र, यावेळेस ‘अबकी  बार चारसो पार’करून विश्वनेता नरेंद्र मोदी यांना आपल्याला पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यामुळे आपलं दुःख विसरून माझ्या तमाम शिवसैनिकांना माझा मानाचा मुजरा आणि कळकळीची विनंती आहे की, प्रचारात सगळ्यांच्या पुढे घड्याळांचे पदाधिकारी असतील त्याच्याही पुढे शिवसैनिकांनी उभे राहून अर्चना ताईंना लीड मिळवून द्यायचा आहे.

आमदार विक्रम काळे म्हणाले, आपल्या जिल्ह्याला 23 टीएमसी पाणी आणण्यासाठी आपण सर्वांनी मिळून अजित दादांना खंबीर साथ देणे गरजेचं आहे. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजित दादांनी आपल्या सर्व शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पिक विमा देण्याचा निर्णय सरकारमध्ये असताना घेतलेला आहे. आज अनेकांना त्याचा फायदा होत आहे. यापुढे देखील अर्चना ताईंना लीड मिळवून देण्यासाठी मोठ्या संख्येने मंतदान करा असे आवाहन देखील त्यांनी केले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading