Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

शिरूर लोकसभा मतदरसंघातून वंचित आघाडीकडून निवडणूक लढवणार – प्राचार्य डॉ.आफताब (अन्वर )शेख

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडी च्या वतीने निवडणूक लढण्यासाठी सज्ज असून नुकतेच वंचितचे संस्थापक अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली असून आपल्याला उमेदवारी मिळणार असल्याचे पुना कॉलेजचे प्राचार्य व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अन्वर शेख यांनी संगितले आहे .
अन्वर शेख यांनी पुना महाविद्यालयात प्राचार्य म्हणुन अतिशय प्रभावी असे कामकाज पाहिले आहे . त्यांचा शिक्षण क्षेत्रात अतिशय दांडगा अनुभव व अभ्यास आहे . त्यांचे विशेष कार्य म्हणजे झोपडपट्टीतील व गरीब ,गरजू पाचवी ,सातवी अथवा नववी नापास मुलांना थेट दहावीची परीक्षा देऊन त्यांचा अभ्यास आणि तयारी करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे मोलाचे कार्य ते करीत आहेत .राष्ट्रपतींच्या हस्ते एका कार्यक्रमात त्यांचा सन्मान देखील करण्यात आला आहे .
आंबेडकरी चळवळीमध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यात त्यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले आहे .शिरूर मतदार संघात त्यांचे विशेष कार्य असून आपली उमेदवारी वंचित बहुजन आघाडीकडून लवकरच जाहीर होणार असल्याचे शेख यांनी यावेळी सांगितले आहे .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading