Saturday, June 6, 2026

Day: April 8, 2024

Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

समाजमाध्यमांवरील उथळ मतांतरांच्या गर्दीत माहितीच्या विश्वासार्हतेला अधिक प्राधान्य देण्याची गरज – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

नागपूर : भारतीय संस्कृतीचा विचार एका भक्कम पायावर उभा आहे. आजच्या माहिती युगात विविध ॲप्स व संकेतस्थळाशी निगडीत समाजमाध्यमांवरील वेगवेगळ्या मतांतरांच्या

Read More
Latest NewsPUNE

आरोग्य क्षेत्रातील तंत्रज्ञ आणि सहाय्यक घडविणारी जीडी गोयंका हेल्थकेअर अकॅडेमी पुण्यात सुरु

आरोग्य क्षेत्रातील तंत्रज्ञ आणि सहाय्यक घडविणारी जीडी गोयंका हेल्थकेअर अकॅडेमी पुण्यात सुरु

Read More
Latest NewsPUNE

शरदचंद्र पवार वैद्यकीय मदत कक्ष ठरतोय रुग्णांसाठी आशेचा किरण

एका महिन्यात साठ रुग्णांना १३ लाखाहून अधिक रुपयांपर्यंत मदत मिळवून दिली बारामती : संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून बारामती

Read More
Latest NewsPUNE

‘विकसित भारत’ च्या उद्दिष्टांवर डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या वतीने चर्चासत्र

पुणे: डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे, यांच्या वतीने  ‘विकसित भारत २०४७’ च्या दूरदर्शी आराखड्याच्या अनुषंगाने, नुकतीच ‘टेलिमेडिसिन क्षेत्राच्या भविष्यातील धोरण’ आणि निरोगी भविष्यासाठी एक आरोग्य दृष्टीकोन या विषयांवर एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्याला २०४७ मध्ये शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत, तोपर्यंत भारताचा विकसित देश म्हणून कायापालट घडवून आणण्यासाठीच्या दूरदर्शी योजनांवरील चर्चेत तरुणांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. भारत सरकारने सुरू केलेला विकसित भारत २०४७ चा कार्यक्रम देशाच्या विविध क्षेत्रांमधील सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी सर्वांगीण दृष्टीकोनातून आखण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने, “विकसित भारत: युवकांचा आवाज” आणि “अमृत काल विमर्श: विकसित भारत @ २०४७” यासारखे अनेक उपक्रम सुरू करण्यात आले असून, यात विद्यापीठे आणि महाविद्यालयांसह विविध घटकांना सूचना, मते पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात, क्रिटिकल केअर स्पेशलिस्ट डॉ. प्राची साठे आणि बालरोग शल्यचिकित्सक डॉ. बी. एस. रट्टा यांनी संवादात्मक विचारमंथन सत्राचे नेतृत्व केले. त्यांनी आरोग्यसेवेतील टेलिमेडिसिनच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. डॉ. बी.एस. रट्टा यांनी टेलिमेडिसिनची गरज आणि सर्वसामान्य जनतेचे निरोगी आयुष्य वाढवण्याची क्षमता याबाबत सखोल विवेचन केले. दरम्यान, डॉ. प्राची साठे यांनी आरोग्यसेवेतील डिजिटलायझेशनच्या महत्त्वावर भर दिला आणि टेल-आयसीयू हे एक परिवर्तनकारी तंत्रज्ञान असल्याचे अधोरेखित केले. ‘निरोगी भविष्यासाठी आरोग्यदायी दृष्टीकोन’ या विषयावर डॉ. डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे क्लिनिकल इमिनेन्सचे

Read More
ENTERTAINMENTLatest News

झी मराठीवरील मालिकांमध्ये गुढीपाडवा जल्लोष

सर्वात पहिले ‘शिवा’ मालिकेत गुढीपाडवा कसा साजरा केला जाणार आहे हे जाणून घेऊया. एका लहान मुलाला वाचवताना शिवाच्या हाताला लागत, हाताला लागल्यामुळे रामभाऊ तिला घरी यायला सांगतात. शिवाला घरी पाहून आशु शॉक होतो. तर दुसरीकडे आशु  गुढी उभारत असताना त्याच्या हातून गुढी सुटते आणि नेमकी त्याचवेळेस शिवा ती सांभाळते. त्यामुळे योगायोगाने आशु आणि शिवाच्या हातून गुढी उभारली जाणार. ही नव्या नात्याची सुरुवात तर नसेल. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मध्ये  अक्षरा फुलपगारे बेपत्ता झाल्याची पोलिसात तक्रार करते. त्या आधीच भुवनेश्वरी अक्षराची ही तक्रार खोटी ठरवत फुलपगारे सरांना समोर उभं करत तिचा आरोप खोटा ठरवते. त्यामुळे अक्षराला भुवनेश्वरीची माफी मागावी लागते . फॅक्टरी मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी कामगार  आग्रह करतात की गुढी अक्षराच्या हातून उभारली जावी. हे कळल्यावर  भुवनेश्वरीला राग येतो.  ह्या वर्षी अक्षरा गुढी उभारून कामगारांना भेट म्हणून पुस्तकं देणार आहे. ‘पारू’ ह्या मालिकेत नेमकं पारू बाहेर गेली असताना क्लायंट ब्रँड अम्बॅसॅडर बरोबरच्या फोटोजची फोटोसची मागणी होते. अखेर पारूला शोधून आणला जातं. पारू घाबरलेल्या अवस्थेत फोटो शूटसाठी तयार होते. नेमका हा दिवस आहे पाडव्याचा. पारूचं अहिल्यादेवीच्या वेशात फोटोशूट होतं आणि त्याचवेळी तिच्या हातून गुढीची पूजा पण पार पडते. ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत अप्पीला  विश्वास बसतो की, रुपालीपेक्षा अमोलची व्यवस्थित काळजी आणि संभाळ कोणीच करू शकत नाही.  तेव्हा ती रूपालीला अमोल हा तुमचा पण मुलगा असल्याचे म्हणते. अमोलला आपण दोघी मिळून सांभाळू असे सांगते. हे बघून घरचे खुश होतात आणि अर्जुन-अप्पी व स्वप्निल-रुपाली अमोलचे आईबाबा आणि मोठ्ठे आईबाबा म्हणून अमोलला सांभाळायचे ठरवतात आणि पूर्ण परिवार मिळून  गुढी पाडव्याचा सण साजरा करतात. अप्पी आणि रुपाली दोघी मिळून अमोलची काळजी घेतात. त्याला अंघोळ वगेरे घालून तयार करतात आणि मग अर्जुन आणि अप्पी, स्वप्निल-रुपाली व सुजय पियु  गुढी उभारतात. ‘सारं काही तिच्यासाठी’ मध्ये निशी- नीरजचा साखरपुडा शुभ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर होणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका आपल्या आवडत्या मालिकांचे गुढीपाडवा विशेष भाग फक्त आपल्या झी मराठीवर.

Read More