Saturday, June 6, 2026
Latest NewsSports

‘लायन्स् प्रौढ करंडक’ टी-२० क्रिकेट २०२४ : गार्गी एज्युकेशन, रायगड वॉरीयर्स संघांची विजयी कामगिरी

पुणे : स्पोटर्सफिल्ड मॅनेजमेंट आणि पुणे लायन्स् तर्फे आयोजित लायन शंतनु सिद्धा स्मृतीप्रित्यर्थ दुसर्‍या ‘लायन्स् प्रौढ करंडक’ (४० वर्षावरील गट) टी-२० क्रिकेट स्पर्धेत गार्गी एज्युकेशन आणि रायगड वॉरीयर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी कामगिरी केली.

वारजे येथील स्केलअप क्रिकेट अ‍ॅकॅडमी येथील मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत विनोद भोईर याच्या ७६ धावांच्या जोरावर रायगड वॉरीयर्स संघाने एसएसपीए क्रिकेट क्लबचा ८ गडी राखून पराभव करत पहिल्या विजयासह गुणांचे खाते उघडले. पहिल्यांदा फलंदाजी करताना एसएसपीए क्रिकेट क्लबने २० षटकात १५९ धावा धावफलकावर लावल्या. पराग केळकर याने ५९ धावांची तर, सचिन नवले याने २१ धावांची खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना रायगड वॉरीयर्सच्या विनोद भोईर याने ३३ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांसह ७६ धावांची खेळी केली. शेखर दालमिया याने ४९ धावांचे योगदान दिले. या दोघांच्या फलंदाजीमुळे रायगड संघाने १२.३ षटकात व २ गडी गमावून संघाला विजय मिळवून दिला.

सुमित खोले याच्या भेदक गोलंदजीमुळे गार्गी एज्युकेशन संघाने रायगड वॉरीयर्सचा ४ गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली. पहिल्यांदा फलंदाजी करताना रायगड वॉरीयर्सला १०६ धावांचे लक्ष्य उभे करता आले. विनोद भोईर याने ३२ धावांची खेळी केली. सुमित खोले याने १६ धावात ३ गडी बाद केले. केतन पासलकर याने ३ तर, अनिल मांडके याने २ गडी बाद केले. गार्गी एज्युकेशन संघाने हे आव्हान १५.४ षटकात व ६ गडी पूर्ण केले. विनायक शिंत्रे याने सर्वाधिक ३० धावांची खेळी केली.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
एसएसपीए क्रिकेट क्लबः २० षटकात ७ गडी बाद १५९ धावा (पराग केळकर ५९ (२७, ४ चौकार, ५ षटकार), सचिन नवले २१, किरीट पाटील ३-३८, आतिश थोरात २-१४)  पराभूत वि. रायगड वॉरीयर्सः १२.३ षटकात २ गडी बाद १६० धावा (विनोद भोईर ७६ (३३, ८ चौकार, ६ षटकार), शेखर दालमिया ४९ (२५, ८ चौकार, १ षटकार), शिवदत्त पटणे १-८); सामनावीरः विनोद भोईर;

रायगड वॉरीयर्सः १८.४ षटकात १० गडी बाद १०६ धावा (विनोद भोईर ३२, सतिश देवोकर १४, सुमित खोले ३-१६, केतन पासलकर ३-१९, अनिल मांडके २-२७) पराभूत वि. गार्गी एज्युकेशनः १५.४ षटकात ६ गडी बाद १०८ धावा (विनायक शिंत्रे ३०, सौरभ रवालिया १३, देवेंद्र चौधरी २-९, किरीट पाटील २-११); सामनावीरः सुमित खोले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading