पहिली ‘एआय एक्सचेंज करंडक’ टी-२० क्रिकेट स्पर्धा ९ एप्रिलपासून
साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार्या या स्पर्धेत मुंबईतील एक संघ, पुणे आणि परिसरातील असे एकूण १० संघ सहभागी झाले आहेत. लाल चेंडूवर होणार्या या स्पर्धेत एकूण २४ सामने होणार आहेत.
स्पर्धेत आयोजक ब्रिलीयंट्स स्पोटर्स अॅकॅडमी, एके स्पोटर्स अॅकॅडमी, ट्रिनिटी स्पोटर्स अॅकॅडमी, आर्यन्स् क्रिकेट अॅकॅडमी, एएसजी क्रिकेट अॅकॅडमी, स्पेशलाईज्ड क्रिकेट अॅकॅडमी, क्रिकेट नेक्स्ट अॅकॅडमी, अरेना ५५ क्रिकेट अॅकॅडमी, घुले क्रिकेट अॅकॅडमी आणि मुंबईचा एसआरटी १० अॅकॅडमी हे संघ विजेतेपदासाठी झुंझणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्या संघाला आणि उपविजेत्या संघाला करंडक मिळणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक, उदयोन्मुख खेळाडू याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू यांना करंडक मिळणार आहे. प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर अशी पारितोषिकांची रेलचेल स्पर्धेत असणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन एआय एक्सचेंजचे संचालक मेहेर करीम आणि पॉश्चर आईसक्रिमचे मोहम्मद आरयाई यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना एएसजी क्रिकेट अॅकॅडमी आणि स्पेशलाईज्ड क्रिकेट अॅकॅडमी या दोन संघांमध्ये रंगणार आहे.
