चिमणीला मिळणार हक्काचे घर
पुणे : आंतरराष्ट्रीय चिमणी दिनानिमित्त लायन्स क्लब पुणे सहकार नगर भारत विकास परिषद स्वारगेट व हेन्केल इंडिया कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘या चिमण्यांनो परत फिरा’ या उपक्रमाला सुरवात. सध्या विविध कारणांनी चिमणीचे अस्तित्व शहरातून नष्ट होत आहे. याचे प्रमुख कारण कॉंक्रिट घरा मध्ये चिमण्यांसाठी घरटी बनू शकत नाहीत. यावर उपाय म्हणुन नाविन्यपूर्ण कॉंक्रिट ब्लॉक बनविण्यात आला असून ती विविध ठिकाणी लावण्यात येणार आहे.
याचे उदघाटन क्रेडई माजी अध्यक्ष व माजी प्रांतपाल अरुण शेठ यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी संकल्पना मांडणारे डॉ प्रसाद खंडागळे , श्रद्धा शाह, विकास माने, रमेश खांबे उपस्थित होते. शारदाश्रम शिरगाव येथे मुलांसाठी कार्यक्रमात नाविन्यपूर्ण संकल्पनेचे महत्व मुलांना सांगितले गेले यावेळी मुख्याध्यापक विजय लोखंडे, संतोष चव्हाण उपस्थित होते. शाळांतील विद्यार्थ्यांना या विषायी प्रोजेक्ट देण्यात येणार आहेत.
मुकुंद नगर येथील भारत विकास परिषद कार्यक्रमात विविध बिल्डर्सना संकल्पना समजावून सांगण्यात आली. येत्या काही दिवसात 5 हजार घरटी लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यातील 1500 घरटे देण्यात आली. या प्रसंगी माणिकलाल बाहेती, सुषमा कोंडे, वासुदेव केंच ईत्यादी उपस्थित होते.
